Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 11 August 2019

कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन: भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टा…

कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन :
  • भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.
  • देशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.
  • या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला. कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

बजरंगला सुवर्णपदकविनेश अंतिम फेरीत :
  • भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
  • जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रांपीमध्ये गेल्या वर्षी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बंजरंग याने पुरूषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला 2 – 0 अशी मात दिली.
  • बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 असे पराभूत केले.

नेपाळात सापडले जगातील सर्वाधिक उंच सरोवर :
  • नेपाळच्या हिमालय पर्वत रांगांत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे. 4,919 मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजेतिलिचो सरोवरही नेपाळातच आहे.
  • तर काही महिन्यांपूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मनंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वत रांगात काजीन सारा सरोवर सापडले. हे सरोवर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसारहे सरोवर 5,200 मीटर उंचावर आहे.
  • तथापियाची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे 1,500 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद आहेअसे चामे ग्रामीण नगरपालिकेचे प्रमुख लोकेंद्र घाले यांनी सांगितले. तसेच सध्या सर्वाधिक उंचीवरील सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर 4,919 मीटर उंचावर असून त्याची लांबी कि.मी.रुंदी 12 कि. मी.तर खोली 200 मीटर आहे.

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचण्या :
  • अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतींबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या.
  • तसेच दोन लघु पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ती 400 कि.मी अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली. तर दोन आठवडय़ात क्षेपणास्त्र चाचण्यांची ही पाचवी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतींविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

No comments