Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 10 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या फलंदाजाने ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली?
A) डेल स्टीन
B) हाशिम आमला
C) लुंगी नगीडी
D) वियान मल्दर

2) कोणता भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?
A) परमवीर चक्र
B) भारतरत्न
C) पद्म विभूषण
D) पद्मश्री

3) 8 ऑगस्ट 2019 रोजी वर्ल्ड आर्चरी महासंघाने दोन समांतर मंडळ निवडून दिल्याने झालेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी _________ याची सदस्यता निलंबित केली.
A) भारतीय तिरंदाजी संघ
B) पोलिश आर्चरी फेडरेशन
C) फ्रेंच आर्चरी फेडरेशन
D) यूएस आर्चरी फेडरेशन

4) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी भारतात कौशल्य विकास कार्यक्रम चालविण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) बरोबर करार केला?
A) आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)
B) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
C) संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
D) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)

5) कोणती भारतीय संस्था चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधकांसोबत संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहे?
A) भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास
B) भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
C) भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद
D) भारतीय तंत्रज्ञान संस्था कोटा

6) कोणत्या देशात जगातल्या 840 एवढ्या सर्वाधिक आदिवासी भाषा बोलल्या जातात?
A) संयुक्त राज्ये अमेरीका
B) पापुआ न्यू गिनी
C) ऑस्ट्रेलिया
D) चीन

7) कोण फोर्ब्सच्या द हायस्ट-पेड फीमेल अ‍ॅथलीट्स 2019’ या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय आहे?
A) मिताली राज
B) सानिया मिर्झा
C) जसप्रीत कौर
D) पी. व्ही. सिंधू
उत्तरे 
1. (B) हाशिम आमला
ऑगस्ट 2019 रोजी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. यापुढे फक्त प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार आहे. 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हाशिम आमलाने तिन्ही क्रिकेट प्रकारात एकूण 349 सामने खेळले आणि त्यात 18 हजारपेक्षा अधिक धावा जमवल्यात्यात 55 शतके व 50 पेक्षा अधिक 88 धावांच्या खेळींचा समावेश राहिला. दक्षिण आफ्रिकेतर्फे त्रिशतक झळकावणारा तो आजवरचा एकमेव फलंदाज आहे.

2. (B) भारतरत्न
भारतरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वाच्च नागरी सन्मान आहे. देशाच्या राष्ट्रपती कडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 1954 सालापासून हा पुरस्कार साहित्यकलासामाजिक सेवाविज्ञान या क्षेत्रात अतूलनिय कामगीरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. 1955 साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आत्तापर्यंत 42 जणांना भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळ पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व त्याच्याखाली भारतरत्नलिहलेला शब्द असतो व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह असते. पण हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार असतो.

3. (A) भारतीय तिरंदाजी संघ
ऑगस्ट 2019 रोजी वर्ल्ड आर्चरी महासंघाने दोन समांतर मंडळ निवडून दिल्याने झालेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी भारतीय तिरंदाजी संघाची (AAI) सदस्यता निलंबित केली. हा निर्णय 12 ऑगस्ट 2019 पासून प्रभावी असणार. तसेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत नियमबद्ध संरचना पूर्ववत करण्याची सुचना दिली.

4. (D) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)
ऑगस्ट रोजी गुरुग्राम (हरयाणा) येथील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) आणि संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO) या जागतिक संघटनेच्या दरम्यान भारतात एक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात करार झाला. सौर ऊर्जा क्षेत्रात विविध स्तरांवरील लाभार्थ्यांसाठी एक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. हा करार सध्या सुरू असलेल्या MNRE-GEF-UNIDO प्रकल्पाचा एक भाग आहे.

5. (A) भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास आणि चेन्नईची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधक संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहेत. IIT मद्रासच्या महासागर अभियांत्रिकी विभागातचे प्रा. डॉ. अब्दुस समाद आणि त्यांची चमू हे संशोधन करीत आहे.

6. (B) पापुआ न्यू गिनी
जगाच्या तुलनेतप्रशांत प्रदेशातल्या पापुआ न्यू गिनी या बेटराष्ट्रामध्ये 840 एवढ्या सर्वाधिक 'आदिवासी (देशी / मूळ / स्थानिक)भाषा बोलल्या जातात. तर मोठ्या प्रमाणावर इंग्रजी वापरणारे संयुक्त राज्ये अमेरीका (335 भाषा) आणि ऑस्ट्रेलिया (319) हे आदिवासी भाषांच्या बाबतीत द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहेत.

7.) D) पी. व्ही. सिंधू
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मानधन मिळविणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीमध्ये मुसंडी मारली आहे. या यादीत तिने 13वे स्थान मिळविले आहे. 'फोर्ब्स'ने ही यादी जाहीर केली आहे. सिंधूने 55 लक्ष डॉलरची (जवळपास 39.08 कोटी रुपये) कमाई केली आहे. पहिल्या १५ खेळाडूंमध्ये ती एकमेव भारतीय आहे.

No comments