Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 13 August 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे

1) ‘रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?
A) रॉजर फेडरर
B) राफेल नदाल
C) डॅनिल मेदवेदेव
D) यापैकी नाही

2) रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक _______ स्पर्धा आहे.
A) बॅडमिंटन
B) टेबल टेनिस
C) टेनिस
D) स्क्वॅश

3) कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?
A) घोटू राम मीना
B) अरुण कुमार सिंग
C) गायत्री कुमार
D) संजय कुमार वर्मा

4) प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक _______ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.
A) प्रकाश महापात्रा
B) प्रत्यूश दाश
C) दयानिधी नायक
D) अमित कुमार

5) भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.
A) वाइस प्रेसिडेंट नायडू
B) लिसनिंगलर्निंग अँड लिडिंग
C) व्हॉट शुड डू अॅज लीडर
D) लिडिंग इंडिया

6) ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?
A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ
C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ
D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ

उत्तरे
1. (B) राफेल नदाल
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल ह्याने रॉजर्स चषक 2019’ ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला. या विजयासह त्याने आपले पाचवे रॉजर्स चषक जिंकले. रॉजर्स चषक (किंवा कॅनेडियन ओपन / कॅनडा मास्टर्स) ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे.

2. (C) टेनिस
रॉजर्स चषक (किंवा कॅनेडियन ओपन / कॅनडा मास्टर्स) ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. सर्व टेनिस खेळाच्या जगतातली तिसरी जुनी स्पर्धा आहे. हार्ड कोर्टवर ही स्पर्धा खेळली जाते. मॉन्ट्रियल आणि टोरोंटो या शहरांमध्ये दरवर्षी आळीपाळीने आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. 1980 सालापासून विषम क्रमात असलेल्या वर्षी पुरूषांसाठीची स्पर्धा मॉन्ट्रियल येथे आयोजित केली जातेतर त्याउलट महिलांसाठीची स्पर्धा टोरोंटो येथे सम क्रमात खेळवली जाते.

3. (A) घोटू राम मीना
घोटू राम मीना यांची कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. सध्या ते युक्रेनच्या कीव शहरात भारतीय दूतावासाचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

4. (C) दयानिधी नायक
प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक दयानिधी नायक यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते. त्यांनी ब्रिटिश सरकार विरोधात भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. राज्य प्रशासनाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर हा सन्मान देण्यात येणार आहे.

5. (B) लिसनिंगलर्निंग अँड लिडिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते चेन्नईमध्ये लिसनिंगलर्निंग अँड लिडिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित आहे.

6. (A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
केंद्र सरकारच्या वाढत्या दडपणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय क्रिडा संघटनेचा दर्जा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे ते आता राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येणार. जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीने (WADA) ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या उद्देशानेआत्तापर्यंत स्वीडन येथे असलेली आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी व्यवस्थापन (International Dope Testing Management -IDTM) ही संस्था क्रिकेटपटूंचे नमुने गोळा करून ते राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेत (NDTL) जमा करीत आहे. IDTM ही BCCIने नमुने घेण्यासाठी नेमलेली बाह्य-संस्था होती.

No comments