Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 14 August 2019

ऐश्वर्या पिसे: मोटारस्पोर्ट्स प्रकारामध्ये विश्वजेतेपद जिंकणारी प्रथम भारतीय बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिसे हिने 'FIM विश्वचषक’ या स्पर्धेमधील महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्स म्हणजेच दुचाकी मोटारगाड्यांच्या शर्यती…

 ऐश्वर्या पिसे: मोटारस्पोर्ट्स प्रकारामध्ये विश्वजेतेपद जिंकणारी प्रथम भारतीय
  • बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिसे हिने 'FIM विश्वचषक’ या स्पर्धेमधील महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्स म्हणजेच दुचाकी मोटारगाड्यांच्या शर्यतीमध्ये विश्वचषक उंचावणारी ऐश्वर्या पिसे ही पहिलीच भारतीय ठरली.
  • 23 वर्षीय ऐश्वर्या पिसे कनिष्ठ गटात दुसऱ्या स्थानावर राहिली. पिसे हिने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होतीतर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिसऱ्या स्थानी राहिली होती. तसेचती स्पेनमधील फेरीत पाचव्यातर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिच्या खात्यात एकूण 65 गुण झाले आणि तिचे जेतेपद निश्चित झाले.
  • पोर्तुगालची रिटा विएरा 61 गुणांसह उपविजेती ठरली. कनिष्ठ गटात पिसे 46 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. चिलीची टोमास डी गावार्डोने 60 गुणांसह जेतेपद पटकावले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २४ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश :
  • इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनंही याबाबत ट्वीट करुन याची माहिती दिली. त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.
  • क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते सात ऑगस्ट 2002 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेत परतणार :
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोन महिन्यांच्या कालखंडानंतर पुन्हा राज्यसभेत परतणार आहेत. राजस्थानमध्ये एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता डॉ. सिंग हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
  • डॉ. सिंग यांनी 1991 ते 2019 अशी 28 वर्षे आसाममधून राज्यसभेचे सदस्यत्व केले होते. जून महिन्यात त्यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आली. आसाम विधानसभेत काँग्रेसकडे पुरेशी मते नसल्याने डॉ. सिंग यांचा राज्यसभेचा मार्ग बंद झाला होता.
  • तर डॉ. सिंग यांच्यासारखे नेते राज्यसभेत आवश्यक असल्याने काँग्रेसने तमिळनाडूतून डॉ. सिंग यांना निवडून आणण्याची योजना आखली होती. याच दरम्यान राजस्थान भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाने राजस्थानमध्ये एक जागा रिक्त झाली होती. तसेच 200 सदस्यीय राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 100 आमदार असूनअपक्ष आणि बसपाचा काँग्रेसला पाठिंबा आहे. यामुळे डॉ. सिंग यांना निवडून येण्यात काही अडचण येणार नाही.

भारतभर क्लाऊड डेटा सेंटर उभारण्यासाठी जियो आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र :
  • डिजिटलीकरणाला गती देण्याच्या हेतूनेरिलायन्स जियो या भारतीय दूरसंचार कंपनीने भारतात क्लाऊड डेटा सेंटर उभारण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी केली आहे.
  • या भागीदारीमधून मायक्रोसॉफ्टच्या अझ्यूर क्लाउड प्लॅटफॉर्मची मदत घेत जियो संपूर्ण भारतभर डेटा सेंटरचे जागतिक दर्जाचे एक मोठे जाळे तयार करणार आहे.
  • जियो हजारो नोडसह संपूर्ण भारतभर एज कंप्यूटिंग अँड कंटेंट डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क’ याची स्थापना करीत आहे. या डिजिटल पायाभूत सुविधेमुळे डिजिटलीकरणाला गती मिळण्यास मदत होणार.

ऑटो सेक्टरला मोठा झटका१९ वर्षांत पहिल्यांदाच घटलं इतकं उत्पादनहजारो नोकऱ्यांवर गदा :
  • देशातील ऑटो सेक्टरला वारंवार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या विक्रीत मोठी घट होत असून सलग नवव्या महिन्यात आकडेवारीत घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांची विक्री ३०.९८ टक्क्यांनी घसरली असून २ लाख ७९० राहिली. जुलै २०१८ महिन्यात हा आकडा २ लाख ९० हजार ९३१ इतका होता. सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चर्सने (SIAM) यासंबंधी एक अहवाल जाहीर केला आहे. ऑटो सेक्टरच्या मंदीचा फटका नोकऱ्यांनाही बसला आहे. ऑटो सेक्टरमधील १५ हजार जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
  • सियामचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑटो सेक्टर क्षेत्रात १९ वर्षांत पहिल्यांदाच इतकी मोठी घट पहायला मिळाली आहे. याआधी डिसेंबर २००० मध्ये इतकी मोठी घसरण पहायला मिळाली होती”. सियामच्या अहवालानुसारगेल्या काही काळात ३०० डिलरशिप्स बंद पडल्या आहेत.
  • जुलै २०१९ मध्ये विक्रीत १८ टक्के घट झाली आहे. सर्वात मोठी घट प्रवासी वाहन क्षेत्रात झाली असून विक्रीत ३५ टक्क्यांची घट झाली आहे. व्यवसायिक वाहनांच्या विक्रीत २५ टक्के घट झाली असूनदुचाकींच्या विक्रीत गेल्या जुलै महिन्याच्या तुलनेत १६ टक्के घट झाली आहे. गाड्यांच्या विक्रीच्या तुलनेत २०१८ मध्ये आकडा २२ लाख ४५ हजार २२४ होता. मात्र यावर्षी १८ लाख २५ हजार १४८ वाहनांची विक्री झाली आहे.
  • सरकारकडून ऑटो सेक्टरला संजीवनी मिळण्याची गरज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक संदेश मिळाला आहे”, असं विष्णू माथूर यांनी सांगितलं आहे.

No comments