Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 31 July 2019

CEOWorldच्या जगातल्या प्रभावशाली CEO अधिकार्‍यांच्या यादीत 10 भारतीयांचा समावेश  : CEOWorld या मासिकेनी ‘2019 या वर्षामधील जगातले सर्वाधिक प्रभावशाली मुख्य कार्यकारी अधिकारी’ या शीर्षकाखाली 121 CEO पदावर असलेल्या लोकांचा समावेश अस…

CEOWorldच्या जगातल्या प्रभावशाली CEO अधिकार्‍यांच्या यादीत 10 भारतीयांचा समावेश  :
  • CEOWorld या मासिकेनी ‘2019 या वर्षामधील जगातले सर्वाधिक प्रभावशाली मुख्य कार्यकारी अधिकारी’ या शीर्षकाखाली 121 CEO पदावर असलेल्या लोकांचा समावेश असलेली एक जागतिक मानांकन यादी प्रसिद्ध केली.
  • या यादीत पहिल्या क्रमांकावर वालमार्टचे CEO डगलस मॅकमिलन हे आहेत. त्यांच्यापाठोपाठ रॉयल डच शेलचे बेन व्हॅन बेउर्डन हे आहेत. सौदी अरामकोचे अमीन एच. नासेर चौथ्या क्रमांकावर आहे.
  • या यादीत दहा भारतीय मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची नोंद झाली. आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि CEO लक्ष्मी मित्तल (3) हे भारतीय गटात सर्वोच्च क्रमांकावर आहेत. इतर नऊ जणांमध्ये मुकेश अंबानी (49), IOCचे अध्यक्ष संजीव सिंग (69) आणि ONGCचे प्रमुख शशी शंकर (77), SBIचे अध्यक्ष रजनीश कुमार (83), टाटा मोटर्सचे गुएंटर बुत्श्चेक (89), BPCLचे डी. राजकुमार (94), राजेश एक्स्पोर्ट्सचे राजेश मेहता (99), TCSचे राजेश गोपीनाथन आणि विप्रोचे अबिदाली झेड. निमुचवाला (118) यांचा समावेश आहे.

प्रिया प्रियदर्शिनी जैन यांना ब्रिटनचा इंडियन वुमन ऑफ इंफ्लुएन्स” पुरस्कार मिळाला :
  • ब्रिटनच्या संसदेचे उच्च सभागृह 'हाऊस ऑफ लॉर्ड्सयेथे 'इंडियन वुमन ऑफ इंफ्लुएन्स अवॉर्डया प्रतिष्ठित पुरस्काराने प्रख्यात फॅशन डिजाइनरसामाजिक उद्योजिका आणि समाजसेविका प्रिया प्रियदर्शिनी जैन यांना गौरविण्यात आले आहे.
  • तेथे आयोजित सत्कार समारंभात जगातल्या 50 सर्वाधिक प्रभावशाली भारतीय स्त्रियांची माहिती देणारी एक पुस्तिका देखील प्रसिद्ध करण्यात आली.
  • हा पुरस्कार ब्रिटनभारतअमेरीकास्पेन आणि स्कॉटलंड यासारख्या विविध देशांमध्ये कार्य करणार्‍या भारतीय स्त्रियांना दिला जातो. विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरलेल्या भारतीय वंशाच्या स्त्रियांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

चांद्रयान-2 चंद्रापासून फक्त तीन पावलं दूर :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-2 ची कक्षा बदलली. चांद्रयान-2 चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर आहे. तसेच कक्षा बदलाचा हा तिसरा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे.
  • शुक्रवारी चांद्रयान 2 ची कक्षा बदलून पृथ्वीपासून 251 किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार आहे. 22 जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 170 किमी व कमाल (एपोजी) 45 हजार 1475 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते.
  • तसेच आणखी दोन वेळा चांद्रयान 2 च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.

तरुण चौधरी विंगसूट स्कायडायव्ह जंप साकारणारा पहिला पायलट ठरला :
  • विंग कमांडर तरुण चौधरी विंगसूट जंप करणारी भारतीय सशस्त्र सेना (आयएएफ) चा पहिला पायलट बनला.
  • चौधरीने एमआय -17 हेलिकॉप्टरमधून 8500 फूट उंचीवरून ही जंप पूर्ण केली.
  • आयोजित केलेल्या मेळाव्यात हे प्रथम फ्लाइंग विंगसूट जंप प्रदर्शन आहे.
  • 21-22 जुलै 2019 रोजी एअर फोर्स स्टेशन जोधपूर येथे कारगिल दिवस उत्सव दरम्यान उडी घेण्यात आली.

नासाच्या उपग्रहाकडून तीन बाह्य़ग्रहांचा शोध :
  • नासाच्या ग्रहशोधन उपग्रहाने तीन नवीन बाह्य़ग्रहांचा शोध लावला असून ते ग्रह पृथ्वीपासून ७३ प्रकाशवर्षे दूर आहेतअसे वैज्ञानिकांनी सांगितले.
  • याबाबतचा शोधनिबंध हा नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून यात तीन नवीन बाह्य़ग्रहांपैकी एक हा खडकाळ व पृथ्वीपेक्षा काहीसा मोठा आहेतर इतर दोन ग्रहांवर वायू जास्त असून ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत. टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे टीओआय २७०’ या तारका प्रणाली भोवती हे ग्रह फिरत असून ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे सॅटेलाइट’ या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते त्याच प्रकारचे ते ग्रह आहेतअसे रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
  • यातील लहान ग्रह हा मातृ ताऱ्यापासून अशा अंतरावर आहे कीतेथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय २७० हा मातृतारा शांत आहे. त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत त्यामुळे तो व त्याभोवती फिरणारे ग्रह यांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह हे ताऱ्यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे ते इतक्या अंतरावर आहेत ज्यामुळे तेथे पाणी असू शकते.

तिहेरी तलाक अखेर रद्द :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अखेर राज्यसभेत तिहेरी तलाकबंदी विधेयक ९९  विरुद्ध ८४ मतांनी मंगळवारी संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला! हे विधेयक गेल्या आठवडय़ात लोकसभेत मंजूर झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या कायद्यावर शिक्कामोर्तब होईल. हा कायदा मोडणाऱ्या पतीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
  • मोदी सरकारसाठी तिहेरी तलाकबंदी विधेयक प्रतिष्ठेचे मानले जात होते. गेल्या लोकसभेत हे विधेयक दोनदा संमत केले गेले मात्रराज्यसभेत त्याला मंजुरी मिळाली नव्हती. वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत नसल्याने केंद्र सरकारला अपयश आले होते.
  • यावेळी मात्र बहुमत नसतानाही मोदी सरकारला तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्यात यश आले. या विधेयकाच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी वरिष्ठ सभागृहातील बहुमत गमावल्याचे पुन्हा सिद्ध झाले. हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याचा  प्रस्ताव मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार इलमारम करीम यांच्यासह विरोधी पक्षांनी मांडला होतातो १००  विरुद्ध ८४ मतांनी फेटाळला गेला.

No comments