Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 12 July 2019

राज्यसेवा मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) शनिवार (१३ जुलै) ते सोमवार (१५ जुलै) दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस…

राज्यसेवा मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) शनिवार (१३ जुलै) ते सोमवार (१५ जुलै) दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
  • मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ प्रवेशपत्र परीक्षेसाठी सोबत असणे अनिवार्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
  • उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावरतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. . तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.

इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा२७ वर्षानंतर फायनलमध्ये धडक :
  • ऑइन मॉर्गनच्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची आजवरची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे आता रविवारी लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी अंतिम लढत रंगणार आहे.
  • बर्मिंगहॅममधील आजच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 224 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करताना 33 व्या षटकातच आठ विकेट्स राखून विजय साजरा केला.
  • सलामीवीर जेसन रॉयची 65 चेंडूत 85 धावांची खेळी इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरली. रॉयच्या या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. जॉनी बेरस्टॉने 34, जो रुटने 49 आणि ऑइन मॉर्गनने 45 धावांची साथ दिली.

६ नव्या पाणबुडया बांधणीसाठी ६.६ अब्ज डॉलरचा प्रकल्प :
  • सहा नव्या पाणबुडयांच्या बांधणीसाठी मोदी सरकारने जागतिक युद्धनौका बनवणाऱ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. भारतातील जहाज बांधणींची क्षमता वाढवण्याबरोबरच नौदलाचा पाणबुडी ताफा बळकट करण्याचे सरकारचे उद्दिष्टय आहे.
  • तंत्रज्ञान हस्तांतरणातंर्गत डिझेल इलेक्ट्रीक पावरवर चालणाऱ्या पाणबुडया भारतात बनवण्याची अट आहे. त्यासाठी इच्छा असल्यास एस.एसजर्मन थायसेनकर्प मरीन सिस्टम्स जीएमबीएचस्वीडिश साब कोकम्सस्पॅनिश नॅवानिया एसए आणि रशियन रोसोबोरोनेक्सपोर्ट ओजेएससी या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
  • ६.६ अब्ज डॉलरचा हा कार्यक्रम असून आधीच तीन वर्ष विलंब झाला आहे. पाणबुडी बांधणीसाठी ज्या परदेशी कंपनीची निवड करण्यात येईल त्यांच्याबरोबर भारतीय कंपनी सुद्धा काम करेल. नव्या पाणबुडी प्रकल्पात ५० टक्के स्वदेशी तंत्रज्ञान असावे असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
  • मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण यामध्ये महत्वाचे असेल. चीनच्या तुलनेत पाण्याखालच्या लढाईत भारताची क्षमता कमी आहे. भारताकडे १३ पाणबुडयांचा ताफा आहे. या सर्व पाणबुडया २० वर्ष जुन्या आहेत. २०३० पर्यंत २४ पाणबुडया बाळगण्याचे भारताचे लक्ष्य आहे.

No comments