Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 11 July 2019

अ.भा.साहित्य संमेलन: उस्मानाबादचा मार्ग सुकर : मागील पाच वर्षांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणार्या  उस्मानाबादकरांचा मार्ग यंदा सुकर होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्थळ पाहणी पथक मंगळव…

अ.भा.साहित्य संमेलन: उस्मानाबादचा मार्ग सुकर :
  • मागील पाच वर्षांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा पाठपुरावा करणार्या  उस्मानाबादकरांचा मार्ग यंदा सुकर होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे स्थळ पाहणी पथक मंगळवारी उस्मानाबादेत दाखल होत आहे. संमेलन आयोजनासाठी सर्व पातळीवर करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला जाणार आहे.
  • त्यासाठी मंगळवार, 16 जुलै रोजी उस्मानाबाद शहर आणि परिसरातील विविध संस्थासंघटनांच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सर्व तयारीकरिता बुधवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यां्ची बैठक होणार आहे.
  • मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता.
  • आगामी 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बुलढाणालातूरनाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ पाहणीकरिता महामंडळाची समिती या दोन ठिकाणी भेट देणार आहे.

नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारली :
  • जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले असून न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
  • नरेश गोयल यांना या घडीला परदेशात जाण्याची परवानगी देता येणार नाहीत्यांना आता परदेशात जावयाचे असल्यास त्यांना १८ हजार कोटी रुपयांची हमी द्यावी लागेलअसे न्या. सुरेश कैत यांनी स्पष्ट केले.
  • दुबईला जाणाऱ्या विमानातून २५ मे रोजी आपल्याला उतरविण्यात आले तेव्हा आपल्याविरुद्ध ईसीआयआर अथवा एफआयआर नोंदविण्यात आलेला नव्हताअसे सांगून गोयल यांनी त्यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेल्या लुक-आऊट नोटिशीला आव्हान दिले आहे.
  • विमानातून आपल्याला पत्नीसह उतरविण्यात आले तेव्हा आपल्याला लुक-आऊट नोटिशीबाबत समजलेअसे गोयल यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

No comments