Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 10 July 2019

रिलायन्स इंडस्ट्री बनली भारतातली नंबर 1 कंपनी : बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच…

रिलायन्स इंडस्ट्री बनली भारतातली नंबर 1 कंपनी :
  • बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.
  • तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच्या पार केलं आहे.
  • कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशन (IOC)ला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
  • तसेच पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या आरआयएलनं वर्ष 2018- 19मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर आयओसीनं 31 मार्च 2019मधल्या वित्त वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचं व्यवहार केला होता. आरआयएलनं आयओसीच्या दुप्पट फायदा कमावून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ :
  • पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता आधार कार्ड पॅन कार्डला 31 जुलैपर्यंत जोडावं लागणार आहे. 31 जुलैपूर्वी आपण पॅनला आधार कार्ड लिंक न केल्यास आपल्याला रिटर्न फाइल करता येणार नाही.
  • तर आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळानं आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. परंतु रिटर्न फाइल करणाऱ्यांना 31 जुलैपूर्वीच पॅन आणि आधार लिंक करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना रिटर्न फाइल करता येणार नाही.
  • तसेच कुठूनही येणारा कर परतावाही अडकून पडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्च 2019पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं वाढवली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2019पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे.
  • परंतु तरीही 1 एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे.

No comments