Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 13 July 2019

सेरेनाचे २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे ध्येय : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रोमानियाची सिमोना हॅलेप विजेतेपदासाठी शनिवारी एकमेकींशी झुंजतील. सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला आता…

सेरेनाचे २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे ध्येय :
  • विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रोमानियाची सिमोना हॅलेप विजेतेपदासाठी शनिवारी एकमेकींशी झुंजतील. सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला आता २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत आहे.
  • सेरेनाने गुरुवारी बाबरेरा स्ट्रायकोव्हाला सहज धूळ चारत ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली. हॅलेपने एलिना स्वितोलिनाचे आव्हान सहजपणे परतवून लावत अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला. सेरेना आणि हॅलेप यांच्यात १० लढती झाल्या असून त्यात ९ वेळा सेरेनाने विजय मिळवला आहे.
  • हॅलेपने चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून गेल्या वर्षी तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते.

२३ वर्षांत पहिल्यांदाच खासदारांनी करून दाखवला हा’ पराक्रम :
  • 11 जुलै 2019 ही तारीख देशाच्या संसदेच्या इतिहासातील लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे. 11 जुलै रोजी सुरू झालेले लोकसभेचे कामकाज तब्बल 13 तास चालल्याची माहिती समोर आली आहे. सकळी 11 वाजता सुरू झालेले संसदेचे कामकाज रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी संपले.
  • गेल्या 20 वर्षांमध्ये संसदेचे सर्वाधिक कामकाज 11 जुलै रोजी झाल्याचे पहायला मिळाले. या दरम्यानप्रश्नोत्तर आणि शून्य पहराव्यतिरिक्त अर्थसंकल्पातील रेल्वेशी निगडीत अनुदानाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आला होता.
  • दरम्यानलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगण्यावरून एकाच दिवसात अर्थसंकल्पातील रेल्वेच्या विषयांवर चर्चा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जास्तीत जास्त खासदारांना यावेळी आपले म्हणणे मांडण्याचेतसेच पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदारांनाही संधी देण्यात यावीअसे ठरवण्यात आले होते. दरम्यानअनेकांना यावेळी बोलण्याची संधी दिल्याची माहिती सू्त्रांकडून देण्यात आली.
  • सभापतींच्या या सुचनेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सभापतींनी कामकाजाची पद्धतच बदलली. माझी पत्नी रूग्णालयात दाखल असतानाही मी आज संसदेत आहे. सर्व खासदारांचे त्यांच्या नव्या पद्धतीला समर्थन असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार जगदम्बिका पाल यांनी दिली.

ग्रीनकार्ड मर्यादा उठवण्याचे अमेरिकी काँग्रेसकडून स्वागत :
  • ग्रीनकार्ड अर्जदारांच्या संख्येवरील सात टक्क्य़ांची मर्यादा उठवणारे विधेयक संमत करण्याच्या निर्णयाचे अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा भारतासह अनेक देशातील बुद्धिमान लोकांना होणार असून त्यांना अमेरिकेचे स्थायी नागरिकत्व मिळणार आहे.
  • अमेरिकी प्रतिनिधिगृहाने हे विधेयक बुधवारी संमत केले असून त्यात ग्रीनकार्ड धारकांवरील सात टक्क्य़ांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. हजारो बुद्धिमान व्यावसायिक लोक ग्रीनकार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असून त्यात भारतीयांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. ग्रीनकार्ड मिळणे याचा अर्थ अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी परवानगी मिळणे असा आहे. त्याच्या माध्यमातून अमेरिकी नसलेल्या लोकांना अमेरिकेत कायम राहून काम करण्याची परवानगी दिली जाते.
  • स्थलांतर व नागरिकत्व उपसमितीचे अध्यक्ष झो लॉफग्रेन यांनी सांगितले,की अमेरिकी उद्योगांना स्पर्धात्मकतेत टिकण्यासाठी  बुद्धिमान लोकांना संधी द्यावी लागणार आहे. ग्रीनकार्डच्या माध्यमातून हे लोक अमेरिकेकडे आकर्षित होतील. जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांसाठी व्हिसा मर्यादा असल्याने अनेकांना संधी मिळत नव्हती.
  • कमी लोकसंख्येच्या देशातील जास्त लोकांना ती मिळत होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे विधेयक मांडले हे कौतुकास्पद असून या विधेयकामुळे उद्योग विकास व अमेरिकेच्या आर्थिक विस्तारास चालना मिळणार आहेअसे अमेरिकी काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले. या विधेयकामुळे सर्वाना समान संधी मिळाली असून यात अमेरिकी कंपन्यांना फायदा होईल तसेच येणारे बुद्धिमान कर्मचारी त्यांच्या कुटुंबापासून दुरावणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार भारताचे मानवरहित रोव्हर :
  • अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत मानवरहित रोव्हर उतरविणार आहे. ही अशा प्रकारची चंद्रावर आखलेली भारताची दुसरी मोहिम असेल. ती यशस्वी झाल्यास चांद्रसंशोधनाबाबत सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारत आणखी चार पावले पुढे जाईल.
  • इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनने (इस्रो) स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेले रोव्हर अवकाशात येत्या सोमवारी प्रक्षेपित केले जाईल. ते सहा किंवा सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. १४.१ कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणेतेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार आहे.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकलेला नाही तिथे भारताचा रोव्हर जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले असून अंतराळ संशोधन व सुरक्षाविषयक बाबींमध्येही आपला देश अग्रस्थानी असावा असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

No comments