Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 14 July 2019

११ दिवसांत हिमा दासने केली सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक : भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर…

११ दिवसांत हिमा दासने केली सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक :
  • भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
  • जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. पाच आणि आठ जुलै रोजी हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
  • वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत ११ दिवसांत भारताला तीन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष :
  • लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वात बदल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • प्रदेशाध्यक्षांबरोबरच काँग्रेसने पाच कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे. नितीन राऊतबसवराज पाटीलविश्वजीत कदमयशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
  • त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनादेखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पक्षाने राज्यातील नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या तारखेला चांद्रयान-२ मोहिमेला होणार सुरुवात :
  • भारताच्या बहुप्रतिक्षीत चांद्रयान-२ मोहिमेकडे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानया मोहिमेची जोरदार तयारी सुरु असताना शनिवारी या मोहिमेची सुरु होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी ही घोषणा केली.
  • डॉ. सिवन यांनी सांगितले कीचांद्रयान-२ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी GSLV MK-III या यानाचा वापर केला जाणार आहे. या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केल्यानंतर त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचण्यास आणि चंद्रावर उतरण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
  • जर चांद्रयानाने चंद्रावर बर्फाचा शोध लावला तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती निर्माण होऊ शकते. या मोहिमेमुळे संशोधनाबरोबरच अंतराळ विज्ञानातही नवनवे मार्ग खुले होतील. प्रक्षेपणानंतर ५३ ते ५४ दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ उतरेल त्यानंतर पढील १४ दिवस हे यान विविध माहिती घेण्याचे काम करेलअसे डॉ. सिवन यांनी सांगितले.
  • चांद्रयान-२च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. या ध्रुवावर आजवर जगातील कोणत्याच देशाचे यान पोहोचलेले नाही. जर आपण ही जोखीम यशस्वीरित्या पार करु शकलो तर वैश्विक वैज्ञानिक समुदायाला याचा फायदा होईल. या मोहिमेसोबत जोखीम आणि लाभ दोन्हीही जोडले गेले आहेत. चांद्रयान ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. यानंतर भारत चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश बनेल.

येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार :

  • येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहे. शिवाय दोन वर्षांच्या आत सर्व 36 राफेल विमानं भारताला मिळणार आहेत. फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानांची निर्मिती करत असून अत्याधुनिक अशा 2 इंजिनांनी राफेल विमान युक्त आहे.
  • पहिलं राफेल विमान येत्या सप्टेंबर महिन्यात भारताला मिळेलअसं संरक्षण उत्पादक विभागाचे सचिव अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितलं. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झँडर जीगलर यांनीही सांगितलं होतं कीअपेक्षित वेळेच्या आधी राफेल विमानं भारताला मिळतील. त्यामुळे भारताला राफेल विमान दोन महिने आधीच मिळणार आहे.
  • भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून एकूण 36 विमानांची खरेदी केली आहे. पुढील दोन वर्षांना हे सर्व  विमानं भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल होतील. राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच या विमानमध्ये आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता आहे.
  • राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

No comments