Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 15 July 2019

इंग्लंडचा ‘सुपर’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता : विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इं…

इंग्लंडचा सुपर’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता :
  • विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.
  • नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.
  • या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटलात्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्दइस्रो लवकरच नवीन वेळ जाहीर करणार :
  • भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इस्रोया संदर्भातली घोषणा केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
  • लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिकारशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.
  • चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाहीअशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.

आयपीएलमध्ये लवकरच आणखी दोन संघ खेळणार :
  • जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीग आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. येत्या 2021 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये 8 संघ खेळतात. अहमदाबादपुणे आणि रांची किंवा जमशेदपूर यामधील दोन संघ 2021 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.
  • अहमदाबादसाठी अदानी ग्रुपपुणेसाठी आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि रांची किंवा जमशेदपूरसाठी टाटा ग्रुप रेसमध्ये आहे. याआधी 2011 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळले होते. मात्र काही विवादांनंतर दोन संघ बाद करण्यात आले आणि ही संख्या पुन्हा आठवर आली होती.
  • दोन नवीन संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठीची योजन तयार झाली असून याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा सुरळीत पार पडली तर 2021 मध्ये आयपीएलमध्ये दहा संघ खेळताना दिसतील. याबाबत आयपीएल संघ मालक आणि अधिकारी यांच्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. जर नवीन दोन संघ दाखल झाले तर आयपीएलला याचा फायदाच होईलयावर सगळ्यांचं एक मत झालं आहे.
  • अदानी ग्रुपने 2010 मध्ये अहमदाबादची फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी प्रयत्न केले होतेमात्र ते यशस्वी झाले नाहीत. 2011 मध्ये सहारा ग्रुपने पुणे वॉरिअर्स संघ विकत घेतला होता. मात्र 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सला आयपीएलमधून हटवण्यात आलं आहे.
  • पुणे वॉरिअर्सने आयपीएलच्या 2011, 2012, 2013 या सीजमध्ये भाग घेतला होता. 2011 मध्ये कोच्ची टस्कर संघही आयपीएलमध्ये सामील करण्यात आला होता. कोच्ची टस्करला त्याच वर्षी आयपीएलमधून हटवण्यात आलं होतं.

No comments