Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 16 July 2019

नौदलाला लवकरच मिळणार 100 टॉरपॅडो मिसाईल :
येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात य…

नौदलाला लवकरच मिळणार 100 टॉरपॅडो मिसाईल :
  • येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.
  • 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.
  • तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असलीतरी त्यानंतरची मागणी मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.
  • तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्सस्वीडनरशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. यापूर्वी इटालियन फर्म ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.

इंजिनमधल्या गळतीमुळे रद्द झालं चांद्रयान २ चं उड्डाण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान २ या महत्त्वाकांक्षी अवकाशयानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड नेमका काय होता ते आता समोर आले आहे. चांद्रयान २ च्या इंजिनमधील गळतीमुळे हे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आता समोर आली आहे. GSLV MK 3 च्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियमच्या गळतीमुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी या चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं मात्र उड्डाणाच्या ५६ मिनिटं आधी ते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देऊन हे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती इस्त्रोने दिली होती. मात्र पाच विविध सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला हेलियमच्या गळतीबाबत माहिती दिली आहे. त्याचमुळे हे उड्डाण रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे आम्ही उड्डाण थांबवतो आहोत अशी घोषणा करण्यात आली आणि लवकरच उड्डाणाची तारीख जाहीर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. तांत्रिक बिघाड नेमका काय झाला होता ते आता या बातमीमुळे समोर आलं आहे.
  • इंजिनात लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते.  आम्हाला हेलियम भरायचे होते आणि आऊटपुट ५० वर सेट करायचे होते. मात्र हेलियमचे प्रेशर खाली येऊ लागले हे आम्ही पाहिले. असे होणे म्हणजे गळती होते आहे हे आम्हाला समजले अशी माहिती एका वरिष्ठ वैज्ञानिकाने इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. गळती एकाच ठिकाणाहून होते आहे की अनेक ठिकाणांहून होते आहे हे आम्ही तपासण्यास सुरुवात केली असंही त्यांनी सांगितलं.

चीनची अंतराळ प्रयोगशाळा १९ जुलैला पुन्हा वातावरणात प्रवेश करणार :
  • चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चीनच्या मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाने शनिवारी ही माहिती दिली.
  • प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळेवर नजर ठेवणाऱ्या या कार्यालयाने सांगितले कीअंतराळयानाचा अधिकांश भाग वातावरणात प्रवेश करताच भस्मसात होऊन जाईल. त्याचे काही अवशेष दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षित समुद्री भागात पडण्याची शक्यता आहे.
  • तियोंगोंग-२ ही तियोंगोंग-१ ची सुधारित आवृत्ती आहे व खºया अर्थाने पहिली अंतराळ प्रयोगशाळा आहे. १५ सप्टेंबर २०१६ रोजी उन्नत जीवन रक्षकइंधन भरणे व दुसऱ्यांदा पुरवठा करण्याच्या क्षमता जाणून घेण्यासाठी ही मोहीम होती.
  • शेंझोऊ-११ व चालकरहित तियानझोऊ-१ कार्गो मिशनच्या माध्यमातून चीनने ती हाती घेतली होती. चीन पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत एका मोठ्या मॉड्यूलर अंतराळ स्थानक निर्मितीच्या तयारीत होता. २०२२ पर्यंत स्थायी स्वरूपाचे अंतराळ स्थानक सुरू करण्याची चीनची योजना आहे. ही अंतराळ प्रयोगशाळा कक्षेमध्ये १००० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करीत आहे. आता हे यान त्याच्या नियोजित काम करण्याच्या कालावधीपेक्षा दोन वर्षे अधिक काळ काम करीत आहे.
  • अशी आहे तियोंगोंग’ - तियोंगोंग-२ची एकूण लांबी १०.४ मीटर असूनत्याचा व्यास ३.३५ मीटर आहे. हे यान अंतराळात पाठवले तेव्हा त्याचे वजन ८.६ टन होते.या प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. यान व त्यावरील सर्व यंत्रसामग्री चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. हे यान पुन्हा वातावरणात प्रवेश करण्यास तयार असूनहेही काम नियोजित पद्धतीने सुरू आहे.

बांगलादेशचे माजी लष्करशहा जनरल ईर्शाद यांचे निधन :
  • बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा जनरल हुसैन मुहम्मद ईर्शाद यांचे वृद्धापकाळातील गुंतागुंतीच्या आजारांमुळे येथील लष्करी इस्पितळात रविवारी निधन झाले. जातीय पक्षाचे प्रमुख व संसदेतील विरोधी पक्षनेते असलेले इर्शाद ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रौशनआता काडीमोड झालेल्या दुसऱ्या विवाहातून झालेला एक किशोरवयीन मुलगा व दत्तक घेतलेली आणखी दोन मुले आहेत.
  • गेल्या २२ जून रोजी प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना लष्करी इस्पितळात दाखल केले गेले होते. हळूहळू एकएक अवयव निकामी होत गेल्याने गेले नऊ दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणेवर ठेवले गेले होते. गेले काही दिवस ते निदान डोळ््यांनी तरी प्रतिसाद देत होतेपण नंतर तेही बंद झाले व रविवारी स. ७.४५ वाजता त्यांचे निधन झालेअसे लष्कराच्या प्रसिद्धी विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी त्यांचे पार्थिव रंगपूर जिल्ह्यातील त्यांंच्या मूळ गावी नेले जाईल. तेथून परत आल्यावर सोमवारी लष्कराच्या बनानी कबरस्तानात दफनविधी करण्यात येईल.
  • बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीदपंतप्रधान शेख हसिना वाजेद व संसदेच्या सभापती डॉ. शिरीन शर्मिन चौधरी यांनी ईर्शाद यांच्या निधनानिमित्त तीव्र दु:ख व्यक्त केले.

No comments