Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 20 June 2019

हवेचे प्रदूषण पाहता येणार ‘डिस्प्ले बोर्ड’ वर :
तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील ‘रिअल टाइम’ हवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी ‘महार…

हवेचे प्रदूषण पाहता येणार डिस्प्ले बोर्डवर : 
  • तुम्हाला नगर रस्ता, हडपसर, बाणेर, तसेच कात्रज या भागांतून येता-जाताना हवेतील प्रदूषणाची नेमकी पातळी कळणार आहे, त्यासाठी या भागातील रिअल टाइमहवा प्रदूषणाची माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) डिस्प्ले बोर्डबसविण्यात येणार आहेत.

ट्रम्प यांची निवडणुकीत कीप अमेरिका ग्रेटची घोषणा :
  • अमेरिकी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित असून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला.
  • या पूर्वी मेकिंग अमेरिका ग्रेट अगेनअशी घोषणा देणाऱ्या ट्रम्प यांनी आता कीप अमेरिका ग्रेटअशी नवी घोषणा दिली आहे.
  • ट्रम्प (वय ७३) हे स्थावर मालमत्ता गुंतवणूकदार होते ते नंतर राजकारणात आले. २०१७ मध्ये ते अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष झाले. ट्रम्प यांच्या विरोधात लढण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात किमान डझनाहून अधिक दावेदार आहेत.
अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड :
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅपिटॉल हिलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले व पहिल्या इराक युद्धाचा अनुभव असलेले माजी लष्करी अधिकारी मार्क एस्पर यांचे नाव संरक्षण मंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.
  • ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले, की सध्याचे लष्कर सचिव मार्क एस्पर हे हंगामी पातळीवर संरक्षण मंत्री म्हणून काम पाहतील. मार्क यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे, ते संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी चांगली पार पाडू शकतील असा विश्वास वाटतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एस्पर यांची कायमस्वरूपी संरक्षण मंत्रिपदी नेमणूक करू असेही त्यांनी स्पष्ट केले. एस्पर हे अनुभवी असून अनेक दिवस त्यांच्या नावावर चर्चा सुरू होती.
  • सध्याचे हंगामी संरक्षण मंत्री पॅट्रिक श्ॉनहान यांनी संरक्षणमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून त्यांचे नाव सिनेटकडे पाठवले जाण्यापूर्वीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव  पदावर राहणार नाही असे स्पष्ट केले.
  • नवे संरक्षण मंत्री एस्पर यांचा नोव्हेंबर २०१७ मध्ये लष्कर सचिव म्हणून शपथविधी झाला होता. त्याआधी ते रेथिऑन या कंपनीत सरकार- संरक्षण संबंध विषयक  उपाध्यक्ष होते . एस्पर हे एक प्रकारे दबाव गटासाठी काम करीत होते व त्यांनी शेकडो डॉलर्सची कंत्राटे त्या वेळी कंपनीला मिळवून दिली होती.
  • त्यांनी लष्कर सचिव म्हणून काम करताना कुठली कंत्राटे दिलेली नाहीत, पण त्यांच्या पुढील निर्णयांवर मागील पाश्र्वभूमीचा परिणाम होऊ  शकतो.  रेथिऑन व युनायटेड टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेवर त्यांच्या पदाचा परिणाम शक्य आहे, अशी टीका क्रू एक्झिक्युटिव्हचे संचालक नोआ बुकबाइंडर यांनी केली आहे.  एस्पर यांनी सिनेटचे नेते बिल फ्रिस्ट यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केले होते.

पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर :
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी (उच्च प्राथमिक) आणि आठवी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातील पाचवीचे १६ हजार ५७९ आणि आठवीचे १४ हजार ८१५ असे एकूण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
  • परीक्षा परीषदेतर्फे ही माहिती देण्यात आली. राज्यात २४ फेब्रुवारीला दोन्ही परीक्षा घेण्यात आल्या. पाचवीच्या ४ लाख ९५ हजार ५४८ विद्यार्थ्यांनी, आठवीच्या ३ लाख ४१ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दोन्ही परीक्षांमध्ये मिळून एकूण १ लाख ७२ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांचे प्रमाण २०.५९ टक्के आहे.
  • पाचवीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण २२.४ टक्के आणि आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण १८.४९ टक्के आहे. यंदा पाचवीच्या परीक्षेतील उत्तीर्णाचे प्रमाण ०.९३ टक्क्य़ांनी घटले आहे, तर आठवीतील उत्तीर्णाचे प्रमाण ५.९२ टक्कय़ांनी वाढले आहे.
  • परीक्षेचा अंतरिम निकाल १६ मे रोजी जाहीर करण्यात आला होता असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अंतिम निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

‘एक देश, एक निवडणूक’च्या निर्णयासाठी समिती :
  • देशभर एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या शिफारशींनंतर ‘एक देश एक निवडणूक’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले.
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास अनेक राजकीय पक्षांचा विरोध असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. लोकसभा आणि राज्यसभेत सदस्य असलेल्या ४० पक्षांच्या प्रमुखांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी २१ पक्षांचे प्रमुख वा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तीन पक्षांनी पत्राद्वारे मत व्यक्त केले आहे.
  • बहुतांश पक्षांनी एकत्र निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही डाव्या पक्षांचा एकत्र निवडणुकीच्या विचाराला विरोध नाही. प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मात्र दोन्ही पक्ष साशंक असल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. सुमारे तीन तास झालेल्या बैठकीनंतर राजनाथ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

No comments