Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 21 June 2019

जागतिक योग दिन 2019 : 21 जून
शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात योगा महत्त्वाची भूमिका बजावतो. निरोगी आयुष्यासाठी नियमित योगासनं करण्याचे सल्ले योगाभ्यासक देतात.संयुक्त राष्ट्रानंही २१ जून हा दिवस जागतिक योग दिन साजरा करण्याच्या …

जागतिक योग दिन 2019 : 21 जून

  • शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात योगा महत्त्वाची भूमिका बजावतो. निरोगी आयुष्यासाठी नियमित योगासनं करण्याचे सल्ले योगाभ्यासक देतात.
  • संयुक्त राष्ट्रानंही २१ जून हा दिवस जागतिक योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. भारताच्या नेतृत्वाखाली १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता



जागतिक संगीत दिवस 2019 : 21 जून

  • आज 21 जून, 2019 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस सोबतच जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय संगीत दिवस, जो फते डे ला म्यूसिक म्हणूनही ओळखला जातो हा वार्षिक संगीताचा उत्सव आहे.
  •  आणि या प्रसंगी लोकांना सार्वजनिक ठिकाणी आणि उद्यानांमध्ये संगीत वाजविण्याची विनंती केली जाते आणि विविध विनामूल्य मैफिल देखील आयोजित केले जातात, जेथे संगीतकार विनामूल्य संगीत प्रदर्शन करतात. जागतिक संगीत दिवस थीम 2019 : ‘Music at the intersections’.



साहित्य अकादमी पुरस्कार – कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला यांचा गौरव :

  • साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा 21 जून रोजी करण्यात आली. मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
  •  साहित्य अकादमीने 22 भाषांमधील युवा साहित्यिकांच्या 11 काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कविता अधिक प्रभावी ठरल्या. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या कार्यकारी समितीने पुरस्कारांना संमती दिली. युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. 35 वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो. फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.



ATM मध्ये कॅश नसेल तर आता बॅंकेला होणार दंड :

  • बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे. 
  • इंग्रजी वृत्तपत्र डीएनएने सुत्रांच्या सहाय्याने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतचे परिपत्रक देखील आरबीआयने सर्व बँकांना पाठवले आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. 
  • विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.



‘मोदी जगातील सर्वात शक्तीशाली नेते’; ‘ब्रिटिश हेराल्ड’कडून भारतीय पंतप्रधानांचा गौरव  :

(पुतीन दुसऱ्या, ट्रम्प तिसऱ्या तर जिनपिंग चौथ्या स्थानी)

  • लंडनमधील ‘ब्रिटिश हेराल्ड’ या मासिकाने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘२०१९ मधील जगातील सर्वात शक्तीशाली नेते’ असल्याचा कौल वाचकांनी दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये मोदींने अनेक बड्या नेत्यांना मागे टाकत वाचकांची पसंती मिळवली. मोदी हे सध्याच्या घडीला जगातील सर्वात शक्तीशाली नेते असल्याचे मत ३०.९० टक्के वाचकांनी नोंदवले आहे.
  • या सर्वेक्षणामध्ये जगभरातील एकूण २५ मोठ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. या सर्वेक्षणामधील प्रथामिक टप्प्यांनंतर तज्ज्ञांच्या समितीने चार जणांचा अंतिम फेरीसाठी निवड केली होती. वाचकांच्या मतांबरोबर संबंधित व्यक्तींसंदर्भात अभ्यास आणि अहवाल तयार करुन मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे ‘ब्रिटिश हेराल्ड’ने म्हटले आहे.
  •  या सर्वेक्षणात मोदींना ३०.९० टक्के, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २९.९० टक्के, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २१.९० टक्के तर चीने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना १८.१० टक्के मते मिळाली आहेत.

No comments