Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 22 June 2019

अमरीश पुरी – दिग्गज अभिनेताला गुगलची मानवंदना :
मोगॅम्बो खुश हुवा! हा डायलॉग उच्चारला की आठवण होते ती अमरिश पुरी यांची. वैविध्यपूर्ण आणि विविधरंगी भूमिका जगणारा आणि पडद्यावर साकरणाऱ्या या महान अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त गुगलने खास…

अमरीश पुरी – दिग्गज अभिनेताला गुगलची मानवंदना :

  • मोगॅम्बो खुश हुवा! हा डायलॉग उच्चारला की आठवण होते ती अमरिश पुरी यांची. वैविध्यपूर्ण आणि विविधरंगी भूमिका जगणारा आणि पडद्यावर साकरणाऱ्या या महान अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केलं आहे. 
  • त्यांचे भेदक डोळे, त्यांचा पहाडी आवाज आणि करारी मुद्रा या गुणांवर ते भूमिका जगत होते. मग तो नगिना सिनेमातला भैरवनाथ असो किंवा दामिनी सिनेमातला बॅरिस्टर इंदरजीत चढ्ढा. तहलका सिनेमातला जनरल डाँग असो की नायक सिनेमातला मुख्यमंत्री प्रत्येक भूमिका ते जगले आहेत. 22 जून रोजी त्यांची जयंती आहे.



जगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट :

  • जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.
  •  स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या 2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे. 
  • अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. 1980 च्या मध्यावधीत अण्वस्त्रांची संख्या 70 हजार होती.



कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत भारतानं व्यक्त केली चिंता :

  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत भारताने चिता व्यक्त केली आहे. दरम्यान, ओपेकमधील प्रमुख देश सौदी अरेबियाशीही भारताने तेलाच्या वाढत्या किंमतींना नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याची विनंती केली आहे. 
  • 20 जून रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. जानेवारी महिन्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाच्या पेट्रोलिअम मंत्र्यांशी चर्चा केली. 
  • ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत सध्या 65 डॉलर्स प्रति बॅरल इतकी आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेच्या नौदलाचे ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणला याचा परिणाम भोगावा लागणार असल्याचे सांगितले होते. याचा परिणामही कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत असल्याचे म्हटले जात आहे.



जीएसटीच्या नफेखोरीविरोधी प्राधिकरणास २ वर्षांची मुदतवाढ :

  • जीएसटी परिषदेने नफेखोरीविरोधी प्राधिकरणास दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून, जीएसटी लागू झाल्यानंतर कमी झालेल्या कराचा लाभ ग्राहकांना न दिल्यास १० टक्क्यांपर्यंत दंडाच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. जीएसटी परिषदेच्या ३५ व्या परिषदेत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.

  • महसूल सचिव ए. बी. पांडेय यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जीएसटी नेटवर्कवर नोंदणीसाठी व्यवसायांना आधारचा वापर करण्याची परवानगी देण्याचा विचार केला जात आहे.

  • जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी दोन महिन्यांची म्हणजेच ३० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एका अर्जाचे नवे जीएसटी विवरणपत्र भरणे १ जानेवारी २०२० पासून सुरू होईल. केंद्रीय मंत्र्याच्या नेतृत्वाखालील तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने मल्टिप्लेक्समध्ये इलेक्ट्रानिक्स इन्व्हॉईस व्यवस्था आणि ई-तिकीट व्यवस्थेला मंजुरी दिली.

  • पांडे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करणे आणि इलेक्ट्रिक चार्जवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करणे हे प्रस्ताव निर्धारण समितीकडे (फिटमेंट कमिटी) पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



मेट्रोसाठी आता देशभरात वन मेट्रो वन कार्ड’ :

  • मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे वन मेट्रो वन कार्डकेंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. 
  • तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वन नेशन वन कार्डयोजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवायसीप्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल.



एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत :

  • जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे. 
  • 28.5 कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेने या प्रकरणी जेएनपीटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. जेएनपीटी सीएसआर फंडातून ही योजना अमलात येणार असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली. जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा केल्या जाणाऱ्या भरावमुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनाऱ्यावरील समुद्राची पातळी वाढत आहे. 
  • जेएनपीटी बंदराच्या समुद्रात होणाºया भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनाºयाची होणारी प्रचंड धूप आणि समुद्राचे पाणी गावागावांत शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने शिवसेनेने एलिफंटा बेटाच्या संरक्षणासाठी सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी केली होती.

No comments