Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 24 June 2019

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा :
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.तर विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महि…

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा :

  • भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.तर विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे.

  • तसेच विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 23 जानेवारी 2017 ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे.
  • याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांचा समावेश आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते.

  • आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत.



वाद असले तरी अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरचे संरक्षण करार :

  • व्यापार विषयावरुन अमेरिकेबरोबर वाद सुरु असला तरी पुढच्या दोन ते तीन वर्षात अमेरिकेबरोबर 10 अब्ज डॉलरचे संरक्षण खरेदी करार करण्याची भारताची योजना आहे. भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-400 मिसाइल सिस्टिम खरेदीच्या करारावरुनही अमेरिका नाराज आहे.

  • अमेरिकेने निर्बंध लादण्याचेही अप्रत्यक्ष इशारे दिले आहेत. भारताने अमेरिकेकडून पोसीडॉन – 8I ही दीर्घ पल्ल्याची दहा गस्ती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तीन अब्ज डॉलरचा व्यवहार आहे. मागच्या आठवडयात संरक्षण मंत्रालयाच्या समितीने खरेदीला प्राथमिक मंजुरी दिली आहे.

  • पुढील मंजुरीसाठी आता ही फाईल संरक्षण खरेदी समितीकडे पाठवली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. भारताने याआधी सुद्धा अमेरिकेकडून पोसीडॉन – 8I विमाने विकत घेतली आहेत.



सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्था अमेरिकेच्या काळ्या यादीत :

  • सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे.लष्कराशी संबंधित उपकरणांवर काम करणाऱ्या या संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

  • अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. या चर्चेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • तर काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्थांत सुपर कॉम्प्युटर निर्माती संस्था सुगॉनचा समावेश आहे. सुगॉन ही कंपनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी पुरवठ्यावर अवलंबून आहे. सुगॉनच्या पुरवठादारांत इंटेल, एनव्हिडिया आणि अ‍ॅडव्हॉन्सड मायक्रो डिव्हायसेस यांचा समावेश आहे. याशिवाय वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सुगॉनच्या तीन उपकंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

  • अमेरिकी वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, सुगॉन आणि वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट या संस्था चीनच्या लष्करी संशोधन संस्थेच्या मालकीच्या आहेत. चिनी लष्करासाठी पुढील पिढीतील उच्चक्षमता असलेली संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम या संस्था करीत आहेत.



आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीची ग्रँडमास्टरच्या दिशेने वाटचाल :

  • इंडोनिशियात झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीने ११ फेऱ्यांमध्ये ७ गुण पटकावात महिला ग्रँडमास्टर (WGM)हा नॉर्म प्राप्त केला. ११ ते २१ जून या कालावधीत निमंत्रितांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत तिने हे यश मिळवले. ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी तीन नॉर्म आवश्यक असतात. ऋचा पुजारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

  • जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या मान्यतेने व इंडोनेशियन चेस फेडरशनेच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फ्रान्स, जॉर्जिया, भारत, रोमानिया, सिंगापूर व व्हिएतनाम या देशातून प्रत्येक एक व इंडोनेशियातील सहा अशा १२ खेळाडूंना आमंत्रित केले होते.

  • भारतातून एकमेव ऋचा पुजारीला आमंत्रित केले होते. इंडोनेशियातील योगर्टा या शहरातील ग्रँड इन्ना मॅलिओनेरो या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा झाली.  या १२ खेळाडूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर खेळायचे असते. महिला ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी नऊ फेऱ्यांमध्ये कमीत कमी ६.५ गुण होणे गरजेचे असते. तसेच आपला रेटींग परफॉर्मन्स २४०० च्या पुढे असवा लागतो. ऋचाने आठव्या फेरीतच ६.५ गुणांची कमाई करत महिला ग्रँडमास्टरच्या पहिल्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले.


भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन :

  • जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर ३-१ ने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

  • आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे.

  • कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या मिनीटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. जपानकडून कानोन मोरीने ११ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय महिलांनी जपानला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. गुरजित कौरने ४५ व्या आणि ६० व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

No comments