Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 04 July 2019

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही : सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभराती…

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही :
  • सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अ‍ॅप गुगलच्या भाषांतराच्या अ‍ॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल.
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची ही कल्पना असून त्यांनी या संदर्भात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेंसह सर्वोच्च न्यायालयातील पत्रकारांशी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात औपचारिक चर्चा केली होती. या वेळी निकाल भाषांतरित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरले.


चांद्रयान-२चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्याची संधीजाणून घ्या कशी कराल नाव नोंदणी :
  • भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ लवकरच आकाशात झेपावण्यास तयार आहे. लाँचिंगसाठी तयार आहे. १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
  •  ‘चांद्रयान-२’ चं लॉचिंग पाहण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच नावनोंदणी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. श्रीहरीकोट्टा येथील दोन लॉचिंग पॅडपैकी एकावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. याच लॉचिंग पॅडपासून काही अंतरावर असलेल्या मैदानासारख्या रॉकेट स्पेस थीम पार्कमधून हे लॉचिंग साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

No comments