Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 5 October 2019

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.


1) नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत ‘ग्लोबल स्टूडंट सोलर असेंबली’ आयोजित केली. हा कार्यक्रम कोणत्या संस्थेच्या भागीदारीने आयोजित करण्यात आला?
A) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
D) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

2) _____________ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
A) आयुषमान भारत
B) स्वच्छ भारत
C) राष्ट्रीय पोषण मिशन
D) मिशन इंद्रधनुष

3) ____________________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.
A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
B) कामगार व रोजगार मंत्रालय
C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
D) मनुष्यबळ विकास मंत्रालय

4) तैवानमध्ये धडकलेल्या _________ चक्रीवादळामुळे कमाल 162 किलोमीटर प्रतितास गतीने वारे वाहू लागले, ज्यामुळे अनेक लोक जखमी झालेत आणि हजारो घरे अंधारात गेली व शेतीचे क्षेत्र नष्ट झाले.
A) पाबुक
B) मिताग
C) एलिस
D) वूटीप

5) ओडिशाच्या चांदीपूर येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या जमिनी-आवृत्तीची मारा क्षमता ________ एवढी आहे.
A) 290 किलोमीटर
B) 450 किलोमीटर
C) 320 किलोमीटर
D) 270 किलोमीटर

6) 3 ऑक्टोबर रोजी _____ येथे ‘जागतिक आर्थिक मंच’च्या ‘भारत आर्थिक शिखर परिषद’ची 33 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
A) नवी दिल्ली
B) मुंबई
C) हैदराबाद
D) बेंगळुरू

7) गुगल कंपनीने 1 ऑक्टोबर रोजी डॉ. हर्बर्ट क्लेबर यांच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला. डॉ. क्लेबर कशासाठी प्रसिद्ध होते?
A) मानसशास्त्रज्ञ
B) ऑन्कोलॉजिस्ट
C) चिकित्सक
D) कृषीशास्त्रज्ञ

उत्तरे 
1. (C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत ‘ग्लोबल स्टूडंट सोलर असेंबली’ आयोजित केली. हा कार्यक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई या संस्थेच्या भागीदारीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात 60 देशांमधून लक्षावधी विद्यार्थ्यांच सहभाग होता.

2. (A) आयुषमान भारत
‘आयुषमान भारत’ किंवा ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, 1 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘आयुषमान भारत’ ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी देशात सुरू करण्यात आली.

3. (A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
30 सप्टेंबर 2019 रोजी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने 22 संस्थांच्या भागीदारीने प्रशिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू केली आहे.

4. (B) मिताग
ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच 'मिताग' चक्रीवादळ उत्तर तैवानमध्ये धडकले. 'मिताग' चक्रीवादळ पूर्व प्रशांत महासागरावरुन प्रवास करीत आहे. तैवान, चीन, जापान आणि कोरिया या देशांना धोक्याची सुचना देण्यात आली आहे.

5. (A) 290 किलोमीटर
30 सप्टेंबर रोजी भारताने त्याच्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्राच्या जमिनी-आवृत्तीची (पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे) यशस्वीपणे चाचणी घेतली. त्याची 290 किलोमीटर एवढी मारा क्षमता आहे.

6. (A) नवी दिल्ली
‘जागतिक आर्थिक मंच (WEF)’च्या ‘भारत आर्थिक शिखर परिषद’ची 33 वी बैठक 3 ऑक्टोबर 2019 पासून नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम “इनोव्हेटिंग फॉर इंडियाः स्ट्रेन्द्निंग साऊथ एशिया, इंपॅक्टींग द वर्ल्ड” या विषयाखाली आयोजित करण्यात आला आहे.

7. (A) मानसशास्त्रज्ञ
अमेरिकेचे डॉ. हर्बर्ट क्लेबर हे एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते आणि ते अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तीच्या संदर्भात संशोधन करणारे एक संशोधक होते. त्यांनी ‘नॅशनल सेंटर ऑन अॅडिक्शन अँड सब्स्टंस अब्युज’ या संशोधन संस्थेची सह-स्थापना केली. डॉ. क्लेबर व्यसनाधीनतेला एक अशी परिस्थिती मानत असे ज्याला संशोधन, औषधे आणि उपचाराच्या सहाय्याने ठीक करता येते.

No comments