Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 5 October 2019

पुढील वर्षी ‘इस्रो’करणार अंतराळात एक नवा प्रयोग: इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस…

पुढील वर्षी इस्रो करणार अंतराळात एक नवा प्रयोग :
  • इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली छाप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा एक कठिण मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेश स्टेशन उभारणार असल्याचं म्हटलं होतं.
  • स्पेश स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचं महत्त्वाचं काम इस्रोला पूर्ण करावं लागणार आहे. ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठिण असल्याचं म्हटलं जात आहे.
  • ही मोहिम सुरू करण्याचा अर्थ इस्रोच्या स्पेस स्टेशन मोहिमेची सुरूवात झाली असं होत नाही. गगनयान मोहिमेनंतरच डिसेंबर 2021 मध्ये स्पेस स्टेशन मोहिम हाती घेतली जाणार आहे. अंतराळात मानवाला पाठवणं आणि डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतरच स्पेश स्टेशन मिशनची सुरूवात करणार असल्याचे” सिवन यांनी स्पष्ट केलं.

जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताहचे आयोजन केले जाते.
  • 2019 संकल्पना: द मून: गेटवे टू द स्टार्स
  • कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.
  • कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाउपग्रहांचे नमुनेचित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
  • पार्श्वभूमीदि. 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होतातर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला. अंतराळाचा मानवाच्या कल्याणासाठीमानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावाहा उद्देश यामागे होता.
  • त्यामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले. सन 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.

स्मिथला धोबीपछाड देत मयांक अग्रवाल ठरला सर्वोत्तम :
  • आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने झळकावलेलं शतक या जोरावर भारताने आपला पहिला डाव 502 धावांवर घोषित केला.
  • मयांक अग्रवालने 215 धावांची खेळी केलीत्याच्या या खेळीत 23 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान मयांकने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथला मागे टाकलं आहे. तर यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान आता मयांक अग्रवालला मिळाला आहे.
  • तसेच स्टिव्ह स्मिथने नुकत्याच पार पडलेल्या अ‍ॅशेस मालिकेत धावांचा रतीब घातला होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टिव्ह स्मिथने 110.57 च्या सरासरीने 774 धावा केल्या होत्या. चौथ्या कसोटी सामन्यात स्मिथने 211 धावांची खेळी केली होती. मयांकने विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं.

तीन बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी 34 समित्या :
  • युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय)पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण सुलभतेने व्हावे यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
  • तर येत्या 1 एप्रिलपासून या या विलीनीकरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच या बँकांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 34 कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीत तिन्ही बँकांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.
  • कर्ज प्रक्रियाकर्ज मुदत आणि ग्राहकांना देण्यात येणा-या लाभांचे मानकीकरण करण्याचा प्रयत्नही समित्या करतील. बँकांचे विलीनीकरण पूर्ण होईपर्यंत ग्राहकांशी संबंधित कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेतयासाठी हे मानकीकरण केले जाणार आहे.

भारताचे NHSRC  बनले प्राधान्यकृत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान धोरणाच्या संदर्भात WHO चे भागीदारी केंद्र :
  • प्राधान्यकृत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान धोरणाच्या संदर्भात WHOचे भागीदारी केंद्र म्हणून कार्य करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था स्त्रोत केंद्रने (NHSRC) जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबत करार केला आहेज्याच्या अंतर्गत केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे.
  • झालेली पुनर्रचना: NHSRC येथे असलेल्या आरोग्य सेवा तंत्रज्ञान विभागाची नवी कार्ये - राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या अंतर्गत अधिग्रहन करण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाची तांत्रिक वैशिष्ट्ये निश्चित करणेवैद्यकीय उपकरणांची देखरेख व व्यवस्थापनासंबंधी धोरणांचे मसुदे तयार करणेआरोग्यविषयक उत्पादनांच्या कल्पक शोधांचे मूल्यांकन करणे आणि निदानाविषयी पुढाकारराष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम अश्या मुद्द्यांशी संबंधी मंत्रालयाला पाठिंबा देणे.

No comments