Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) _______ ने ‘टीम कॅशलेस इंडिया’ नावाचा उपक्रम चालविलेला आहे.
A) व्हिसा
B) मास्टरकार्ड
C) गूगल पे
D) फोन पे
2) राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) याचे मुख्य कार्यालय _____ येथे आहे.
A) बेंगळुरू
B) पुणे
C) हैदराबाद
D) नवी दिल्ली
3) कोणत्या देशाच्या लष्कराने त्याच्या अधिकृत नोंदींना डिजिटल करण्यासाठी ‘OASIS’ कार्यक्रमाचे अनावरण केले?
A) ब्रिटिश
B) कॅनेडियन
C) भारतीय
D) अमेरिकन
4) जागतिक पोलाद संघाच्या (वर्ल्डस्टील) उपाध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली?
A) टी. व्ही. नरेंद्रन
B) लक्ष्मी मित्तल
C) शशी रुईया
D) सज्जन जिंदल
5) उत्तरप्रदेश राज्य _______ या देशाची कला असलेला ‘खोन रामलीला कार्यक्रम’ भारतात प्रथमच आयोजित करणार आहे.
A) थायलँड
B) कंबोडिया
C) नेपाळ
D) श्रीलंका
6) _________ येथे पाचवी जागतिक कॉफी परिषद भरविण्यात येणार आहे.
A) कोची
B) बेंगळुरू
C) दुबई
D) बोस्टन
उत्तरे
1. (B) मास्टरकार्ड
मास्टरकार्ड कंपनी आणि त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर महेंद्र सिंग धोनी यांनी देशात ‘टीम कॅशलेस इंडिया’ नावाचा उपक्रम चालविलेला आहे. भारतात डिजिटल देयकांना चालना देण्याच्या उद्देशाने कंपनीच्या व्यासपीठावर अधिकाधिक व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना एकत्र करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
2. (C) हैदराबाद
हैदराबादमधील राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) हे एक भारतीय सार्वजनिक आरोग्य, पोषण आणि संशोधन केंद्र आहे आणि ते UCMR-ICMR संस्थेच्या अखत्यारीत कार्य करणारे सर्वात जुने केंद्र आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “कॉर्पोरेट माय स्टॅम्प” या योजनेतून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
3. (C) भारतीय
भारतीय लष्कराने त्याच्या अधिकृत नोंदींना डिजिटल करण्यासाठी ‘OASIS’ (Officers Automated Structures Information System) कार्यक्रमाचे अनावरण केले. हे लष्कराच्या इंट्रानेटद्वारे व्यवस्थापित केले जाणार आहे.
4. (D) सज्जन जिंदल
JSW स्टील उद्योगाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांची जागतिक पोलाद संघाच्या (World Steel Association -वर्ल्डस्टील) उपाध्यक्षपदी एका वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
5. (A) थायलँड
उत्तरप्रदेश राज्य सरकार थायलँडची कला असलेला ‘खोन रामलीला कार्यक्रम’ (KHON Ramlila program) भारतात प्रथमच आयोजित करणार आहे. हा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसांपैकी एक आहे. या कलेत रामायणातल्या कथांना नृत्य कलेद्वारे सादर केले जाते, ज्यात कलाकार कोणतेही संवाद किंवा पार्श्वसंगीताचा वापर करीत नसतात. कलाकार विविध मुखवटे घालून नृत्य करतात. हा कार्यक्रम 26 ऑक्टोबरला अयोध्या या शहरात भव्य दीपोत्सव कार्यक्रमात सादर केला जाणार आहे.
6. (B) बेंगळुरू
बेंगळुरूमध्ये 7 ते 9 सप्टेंबर 2020 या काळात जागतिक कॉफी परिषदेची पाचवी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा विषय “सस्टेनेबिलिटी थ्रू कंझंप्शन’ हा आहे. भारत सध्या जगातला सहावा सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे.
No comments