प्रथम ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ कार्यरत : 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेली ही पहिली बौद्ध सर्किट …
प्रथम ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ कार्यरत :
- 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेली ही पहिली बौद्ध सर्किट ट्रेन आहे.
- ही रेलगाडी नवी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून निघाली व तिथेच गाडीचा प्रवास संपणार. प्रवासादरम्यान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंध असलेल्या भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधल्या महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली जाणार आहे.
केवळ महिलांचा सहभाग असलेला ऐतिहासिक स्पेसवॉक :
- अवकाश इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या दोन महिलांनी एकाचवेळी स्पेसवॉक केले. आतापर्यंत महिलांनी स्पेसवॉक केले नाही अशातला भाग नाही, पण आताच्या स्पेसवॉकमध्ये केवळ महिलाच होत्या.
- तर या दोन महिलांमध्ये ख्रिस्तिना कॉच, जेसिका मेयर यांचा समावेश आहे. शुक्रवारी या दोन महिलांच्या जोडीने स्पेस वॉक केले. गेल्यावेळी स्पेससूटमध्ये समस्या निर्माण झाल्याने हा ऐतिहासिक स्पेस वॉक रद्द करावा लागला होता.
- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पॉवर कंट्रोलरची दुरूस्ती करण्यासाठी या दोघी अवकाशस्थानकाबाहेर पडल्या. प्रमाणित सुरक्षा तपासणी करून त्यांनी अवकाशस्थानकाबाहेर पाऊल ठेवले. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी
- सांगितले, की केवळ महिलांचा सहभाग असलेला स्पेसवॉक ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कॉच या विद्युत अभियंता असून, मेयर या सागरी जीवशास्त्रात पीएचडी आहेत. सोविएत रशियाची व्हॅलेंतिना तेरेश्कोवा ही 1963 मध्ये पहिली महिला अवकाशयात्री ठरली होती. 1982 मध्ये स्वेतलाना सावित्स्काया ही पहिली महिला स्पेसवॉकर ठरली होती.
महाराष्ट्र पोलिसांनी AI फर्म शी करार केला :
- बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी आणि रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी विस्तारित बुद्धिमत्ता (कृत्रिम व मानवी बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञान कंपनी 'लॉजिकल' शी करार केला आहे.
- कंपनी बनावट बातम्या, लॉजिकल पळवाट आणि चुकीच्या गोष्टी शोधण्यात मदत करते.
- आदर्श आचारसंहितेनुसार (MCC) उल्लंघन केल्याच्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी ते 20 दिवसांपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून आहेत.
भारतीय बॉक्सरने 21 पदके जिंकली :
- एशियन ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मुष्ठियोद्ध्यांनी युएईच्या फुजैराह मधील 26 स्पर्धक देशांमधील सर्वोत्तम पदकांची शर्यत सहा सुवर्ण व नऊ रौप्यसह 21 पदके जिंकली.
- भारतीय पुरुष संघाने दोन सुवर्ण, तीन रौप्य व तितकेच कांस्यपदक जिंकले, तर महिलांनी चार सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्यपदके जिंकली.
जम्मू-काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश :
- जम्मू व काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तेथली 62 वर्षे जुनी विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश जम्मू व काश्मीर प्रशासनाने दिले आहेत. हे आदेश राज्य सरकारचे सचिव फारुक अहमद लोन यांनी दिले.
- ‘जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा-2019’ मधल्या कलम 57 अन्वये जम्मू-काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेतील सर्व कर्मचारी 22 ऑक्टोबरपासून सामान्य विभाग प्रशासनाकडून येणार्या सूचनांचे पालन करणार आहेत.
No comments