Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 21 October 2019

जवानांना मिळाले मजबूत स्वदेशी सुरक्षाकवच : काश्मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे.तर विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल देख…

जवानांना मिळाले मजबूत स्वदेशी सुरक्षाकवच :
  • काश्मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. तर विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एके-47’ रायफल देखील हे कवच निष्प्रभ ठरवणार आहे. कारणस्वदेशी बनावटीचे मजबूत असे तब्बल 40 हजार बुलेटप्रुफ जॅकेट नुकतेच भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
  • हे स्वदेशी बनावटीचे बुलेटप्रुफ जॅकेट अत्यंत कठीण स्टीलपासून तयार झालेल्या एके- 47 राइफलच्या गोळ्या देखील झेलू शकते. शिवायअन्य शस्त्र देखील याच्यासमोर निष्प्रभ ठरतील.
  • बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेलमेटची देखील निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके – 47 राइफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चीनमध्ये जागतिक लष्करी खेळ 2019’ याचा आरंभ :
  • चीनच्या वुहान या शहरात 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातव्या आंतरराष्ट्रीय लष्करी क्रिडा परिषद (CISM) लष्करी जागतिक खेळ” या कार्यक्रमाचा आरंभ झाला.
  • यावर्षी या कार्यक्रमात सुमारे 100 देशांमधून जवळपास 10 हजार लष्करी कर्मचारी एकत्र आले आहेत. यंदा स्पर्धेसाठी 23 क्रिडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे.
  • यावेळी या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जगातला सर्वात मोठा 3डी स्टेज तयार करण्यात आला आहे.

नासाने चंद्र अभियानासाठी स्पेस-सूटचे अनावरण केले :
  • नासाने आगामी आर्टेमिस प्रोग्रामसाठी पुढील पिढीच्या स्पेस-सूटचे अनावरण केले आहे.
  • आर्टेमिस 2024 पर्यंत लॉन्च होणार आहे.
  • हे चंद्रावरील नासाची पहिली महिला मिशन असेल.
  • हा स्पेस-सूट अधिक लवचिक आणि पोशाखात सोपा असेलअसं नासाने कळवलं.
  • नासाने घोषित केले की ते अंतराळवीरांना दगड उचलण्यास आणि सहजतेने हलविण्यास अनुमती देईल.

2021-22 या सत्रापासून सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश :
  • केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 2021-22 या सत्रापासून सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • मिझोरममधील सैनिक स्कूल चिंगचिप येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
  • भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून लैंगिक समानतेच्या दृष्टीने सशस्त्र दलात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवा या उद्दीष्टेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सचिन-सेहवागच्या कामगिरीची रोहितकडून पुनरावृत्ती :
  • वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३ द्विशतकांची नोंद आहे. रोहितनं या द्विशतकासह Fantastic Four दिग्गजांमध्ये स्वतःच नाव समाविष्ठ केलं आहे. वन डे आणि कसोटीत द्विशतक झळकावणारा रोहित चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरवीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत.
  • रोहितनं आणखी एका विक्रमाची भर घातली. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला.

1 comment