Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) श्रीलंकेत _____ या ठिकाणी तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडण्यात आले, जेथे चेन्नईहून पहिले प्रवासी विमान उतरले.
A) पट्टलम
B) जाफना
C) कोगगाला
D) कॅंडी
2) कोणता देश वर्ष 2020 पासून अग्रगण्य डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के ‘वेब कर’ लागू करणार आहे?
A) स्पेन
B) इटली
C) फ्रान्स
D) इंग्लंड
3) 20 ते 26 ऑक्टोबर 2019 दरम्यान भारतीय रेल्वे _______ सर्किटमध्ये पहिली ट्रेन चालवेल.
A) संगम सर्किट
B) कृष्णा सर्किट
B) बुद्धिष्ट सर्किट
C) रामायण सर्किट
4) कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनीशी करार केला?
A) गोवा
B) महाराष्ट्र
C) मध्यप्रदेश
D) राजस्थान
5) यशस्वी जयस्वाल हा ‘लिस्ट-A’ श्रेणीत दुहेरी शतक करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू ठरला आहे. तो _______ साठी खेळतो.
A) मुंबई
B) विदर्भ
C) कर्नाटक
D) उत्तरप्रदेश
6) ईशान्येकडील कोणत्या राज्यात तिसर्या ‘शिरूई लिली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले?
A) मिझोरम
B) मणीपूर
C) नागालँड
D) मेघालय
7) 11वी ‘अणुऊर्जा परिषद’ ______ या देशात आयोजित केली गेली.
A) दक्षिण कोरिया
B) भारत
C) फ्रान्स
D) इंग्लंड
8) भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची शिफारस केली गेली आहे?
A) न्या. चोकलिंगम नागप्पन
B) न्या. चेलमेश्वर
C) न्या. शरद बोबडे
D) न्या. अर्जन कुमार सिक्री
उत्तरे1. (B) जाफना
श्रीलंकेत नव्या जाफना आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. ते देशातले तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
2. (B) इटली
इटली वर्ष 2020 पासून अग्रगण्य डिजिटल कंपन्यांवर 3 टक्के ‘वेब कर’ लागू करणार आहे.
3. (B) बुद्धिष्ट सर्किट
19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेली ही पहिली बौद्ध सर्किट ट्रेन आहे. प्रवासादरम्यान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंध असलेल्या भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधल्या महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली जाणार आहे. लुंबिनी (बुद्धांचे जन्मस्थान), बोधगया (आत्मज्ञान प्राप्तीचे ठिकाण), सारनाथ (बुद्धांचे पहिले प्रवचन) आणि कुशीनगर (बुद्धांच्या निर्वाणाची जागा) यासारख्या महत्त्वाच्या बौद्ध स्थळांचा या प्रवासात समावेश करण्यात आला आहे.
4. (B) महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाने खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘लॉजिकली’ या कंपनीशी करार केला आहे.
5. (A) मुंबई
मुंबईचा यशस्वी जयस्वाल हा ‘लिस्ट-A’ श्रेणीत दुहेरी शतक करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू ठरला आहे. यशस्वी जयस्वालने विजय हजारे चषकाच्या सामन्यात 203 धावा काढल्या. त्याचे वय 17 वर्षे आणि 192 दिवस आहे.
6. (B) मणीपूर
17 ऑक्टोबर 2019 रोजी मणीपूर राज्याच्या उखरूल या शहरात ‘शिरूई लिली महोत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम 16 ते 19 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणार आहे. शिरूई इथले लिली हे फूल राज्य फूल आहे.
7. (B) भारत
इंडिया एनर्जी फोरमच्या वतीने नवी दिल्लीत 11वी ‘अणुऊर्जा परिषद’ आयोजित करण्यात आली. परिषदेदरम्यान हरियाणाच्या गोरखपूर येथे नवा अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
8. (C) न्या. शरद बोबडे
भारताचे सरन्यायाधीश (CJI) रंजन गोगोई यांच्या जागी 18 नोव्हेंबर 2019 रोजी पदाचा कार्यभार घेणारे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे भारताचे 47 वे सरन्यायाधीश असणार आहेत. न्या. गोगोई यांनी त्यांची शिफारस केली.
No comments