NITI आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’मध्ये कर्नाटक अव्वल : राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या …
NITI आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’मध्ये कर्नाटक अव्वल :
- राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था (NITI) आयोगाने या वर्षीचा ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2019’ प्रसिद्ध केले आहे. ही यादी तयार करण्यात इंस्टीट्यूट फॉर कॉम्पटेटिवनेस या संस्थेनी नॉलेज पार्टनर म्हणून काम केले.
- या अभ्यासात नवकल्पनात्मक शोधांसाठी वातावरण तयार करण्यासाठी भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रयत्नांमध्ये येणारी आव्हाने आणि अडथळे दूर करून आर्थिक वाढीसाठी धोरणे आखण्यास मदत मिळते.
- मनुष्यबळ, गुंतवणूक, ज्ञानी कामगार, व्यवसायासाठी वातावरण, सुरक्षितता व कायदेशीर वातावरण, नॉलेज आउटपुट आणि नॉलेज डिफ्यूजन अश्या सात स्तंभावर हा अभ्यास केला गेला आहे.
- कर्नाटक हे नवकल्पनात्मक शोधाच्या क्षेत्रात भारतातले अव्वल राज्य ठरले. पायाभूत सुविधा, ज्ञानी कामगार, नॉलेज आऊटपुट आणि व्यवसायासाठी वातावरण या क्षेत्रात राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शीर्ष 10 मध्ये समाविष्ट होणारी इतर राज्ये (अनुक्रमे) - तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, हरियाणा, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्रप्रदेश.
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे भारताचे 47 वे सरन्यायाधीश होणार :
- नागपुरात जन्मलेले मराठीभाषक न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे भारताचे 47वे सरन्यायाधीश होणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाकडे आपले उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील आपल्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती असलेल्या न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस केली असून, भावी सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे निश्चित मानले जात आहे.
- सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, 18 नोव्हेंबर रोजी न्या. बोबडे शपथ घेऊन सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील. न्या. बोबडे यांना सरन्यायाधीश म्हणून 23 एप्रिल, 2021पर्यंत 17 महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन :
- तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई येथे अरुणाचलम सिनेमा थिएटरमध्ये लेखक आणि कलाकार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 6 व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले.
- हे तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह राइटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशन आयोजित करीत आहे.
- पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये 12 देशांतील 22 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन दाखवले जाईल.
पीव्ही सिंधू सर्वात जास्त मानधन घेणारी महिला खेळाडू :
- फोर्ब्स या वर्षाच्या (1 जून, 2018 से 1 जून, 2019) सर्वाधिक पगाराच्या महिला खेळाडूंच्या यादीनुसार पीव्ही सिंधू सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला खेळाडू असून जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला बॅडमिंटनपटूही आहे.
- सिंधू या वर्षी जगातील 13 व्या स्थानावर असून एकूण कमाई 5.5 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
- या यादीमध्ये सेरेना विल्यम्स अव्वल आहे.
देशातली ‘पशुधन गणना 2019’ :
- देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.
- सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती. मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
- गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे. देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.
- सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.
- मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.
- दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.
- घरामागच्या अंगणात होणार्या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).
No comments