Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या हवाई सेवा कंपनीने ‘अंदमान टूरिझम अवॉर्ड 2019’ या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट हवाई सेवा कंपनीचा पुरस्कार जिंकला?
A) स्पाइसजेट
B) गो एयर
C) इंडिगो
D) विस्तारा
2) कोणती अंतराळ संशोधन संस्था प्रक्षेपणातला खर्च कमी करण्यासाठी पुनर्वापराजोगे प्रक्षेपक विकसित करीत आहे?
A) ISRO
B) JAXA
C) NASA
D) ESA
3) ONGC विदेश लिमिटेड (OVL) या कंपनीने _____ आणि _____ या देशांमध्ये तेल शोधले आहे.
A) कोलंबिया आणि ब्राझील
B) अर्जेंटिना आणि ब्राझील
C) पेरू आणि कोलंबिया
D) नायजेरिया आणि केनिया
4) ‘ग्लोबल हंगर इंडेक्स-2019’ याच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
A) 93 वा
B) 102 वा
C) 95 वा
D) 88 वा
5) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन’ पाळला जातो?
A) 16 ऑक्टोबर
B) 17 ऑक्टोबर
C) 18 ऑक्टोबर
D) 17 सप्टेंबर
6) कोणत्या रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय हरित न्यायपीठाने ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदूषण कमी करण्याचे निर्देश दिले आहेत?
A) फरीदाबाद
B) गाझियाबाद
C) फैजाबाद
D) लुधियाना
उत्तरे
1. (B) गो एयर
गो एयर या हवाई सेवा कंपनीने ‘अंदमान टूरिझम अवॉर्ड 2019’ या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट हवाई सेवा कंपनीचा पुरस्कार जिंकला.
2. (A) ISRO
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रक्षेपणातला खर्च कमी करण्यासाठी पुनर्वापराजोगे प्रक्षेपक (Reusable Launch Vehicles -RLV) विकसित करीत आहे. त्यामध्ये स्पेस शटल सारखे अंतराळयान असणार ज्यामध्ये एयर-ब्रीदिंग रामजेट मशीन बसविलेले असेल आणि कर्नाटकमध्ये त्याचे प्रथम लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल.
3. (A) कोलंबिया आणि ब्राझील
ONGC विदेश लिमिटेड (OVL) या कंपनीने कोलंबिया आणि ब्राझील या देशांच्या सागरी क्षेत्रात तेल शोधले आहे. कोलंबियाच्या लियानोस खोर्यात तेलसाठा तर ब्राझीलच्या BM SEAL 4 ब्लॉकमध्येही मोठा वायूसाठा सापडला आहे.
4. (B) 102 वा
यावर्षीचा ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ (GHI) या शीर्षकाखाली एक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. हा अहवाल जर्मनीची वेल्थ हंगर हिल्फे आणि आयरलॅंडची कंसर्न वर्ल्डवाइड या ना-नफा संस्थांनी तयार केला आहे. आकड्यांनुसार, 117 देशांच्या यादीत उपासमारीच्या बाबतीत भारत 102 व्या क्रमांकावर आहे. 2014 सालापासून भारताच्या क्रमांकात सतत घट होत आहे. 2014 साली भारत 77 देशांमध्ये 55 व्या क्रमांकावर होता. उपासमारीच्या आधारावरून भारताला 30.3 गुण मिळाले आहेत. याचा अर्थ भारतात उपासमारीचे गंभीर संकट आहे.
5. (B) 17 ऑक्टोबर
17 ऑक्टोबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन’ (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो. जगभरातील समुदायांमध्ये गरीबी हटविण्यासाठी केल्या जाणार्या प्रयत्नांच्या बाबतीत जागरूकता वाढवणे, हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. 2019 सालाची संकल्पना – ‘अॅक्टिंग टुगेदर टू एमपॉवर चिल्ड्रेन, देअर फॅमिलीज अँड कम्यूनिटीज टू एंड पॉवर्टी’
6. (C) फैजाबाद
फैजाबाद रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय हरित न्यायपीठाने ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदूषण कमी करण्याचे निर्देश दिले. सिमेंट आणि खतांची वाहतूक हे प्रदूषणाचे कारण आहे. न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वात पीठाने आदेश दिलेत.
No comments