Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 17 October 2019

एयर इंडिया: विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी : एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी आहे.एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी…

एयर इंडिया: विमानांसाठी टॅक्सीबॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी :
  • एयर इंडिया ही विमानांसाठी टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी आहे.
  • एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला.
  • टॅक्सीबॉट म्हणजे काय?टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.
  • विमानतळावर विमानाला चालू अवस्थेत हलवणे अशक्य असतेत्यावेळी  विमानाच्या वाहतुकीसाठी अश्या वाहनांचा उपयोग केला जातो.

UNESCOच्या सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारासाठी भारतातल्या चार स्थळांची निवड झाली :
  • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिकवैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) या संस्थेनी या वर्षीचा ‘‘सांस्कृतिक वारसा संवर्धन’ संदर्भातला UNESCO आशियाई-प्रशांत पुरस्कार’ जाहीर केला.
  • पुरस्कारासाठी भारतचीनन्यूझीलंडऑस्ट्रेलिया आणि भुटान या देशांमधल्या 16 प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यात भारतातल्या चार स्थळांची निवड झाली आहे.
  • मुंबई या शहरातल्या अवर लेडी ऑफ ग्लोरी चर्चकेनेसेथ ईलियाहू सिनेगॉग आणि फ्लोरा फाउंटन या तीन महत्त्वाच्या वस्तू तसेच IIM अहमदाबादच्या परिसरातले विक्रम साराभाई ग्रंथालय यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

भारतीय रेल्वे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक होईल :
  • हवामान बदलाशी लढा देण्याच्या भारताच्या रणनीतीचा एक भाग म्हणूनभारतीय रेल्वे 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक होईल.
  • अमेरिका आणि चीननंतर भारत हा ग्रीन हाऊस वायूंचा सर्वात मोठा उत्सर्जक आणि हवामान बदलाच्या बाबतीत असुरक्षित देशांपैकी एक आहे.
  • त्याच वेळीराष्ट्रीय वाहक जवळजवळ 125,000 किलोमीटरचे रेल नेटवर्क आहेजे व्यवस्थापनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे.

आयसीसीने सुपर ओव्हर नियमात बदल केला :
  • इंग्लंडला बाऊंड्री मोजणीवर न्यूझीलंडविरुध्द विजयी घोषित करण्यात आले तेव्हा पुरुषांच्या विश्वचषक फायनल 2019 च्या निकालानंतर झालेल्या गदारोळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) सर्व प्रमुख कार्यक्रमांसाठी सुपर ओव्हर नियमात बदल केला आहे.
  • नव्या नियमानुसारसुपर ओव्हर टायच्या बाबतीतएका संघाकडून दुसर्‍यापेक्षा जास्त धावा होईपर्यंत पुनरावृत्ती सुपर ओव्हर होईल.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने झळकावला ७०० वा ऐतिहासिक गोल:
  • पोर्तुगाल संघाचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेने युक्रेनविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. युएएफए युरो पात्रता स्पर्धेत (UEFA Euro Qualifier) रोनाल्डोने कारकिर्दीतला ७०० वा गोल नोंदवला.
  • या ७०० गोलपैकी रोनाल्डोने ४५० गोल हे रियाल माद्रिदसाठीमँचेस्टर युनायटेडसाठी ११८स्पोर्टिंग ७ आणि युव्हेंटस क्लबसाठी ३२ गोल केले आहेत. तरपोर्तुगाल संघासाठी त्याने ९५ गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोने सहावे स्थान काबीज केले आहे. पेले (७६७)जोसेफ बिसॅन (८०५)रोमारिओ (७७२)फेरेंस पुस्कास (७४६) आणि गेर्ड म्युलर (७३५) हे दिग्गज खेळाडू रोनाल्डोच्या पुढे आहेत.

आशियातील सर्वात लांब चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव :
  • केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'चेनानी-नाशरीबोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले कीजम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे. ज्यांनी देशासाठी 'एक निशानएक विधान व एक प्रधानहा मंत्र दिला होता.

No comments