Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या औषधीनिर्माता कंपनीने औषधी-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध तयार केले?
A) सिप्ला
B) मायलान
C) सन फार्मास्युटिकल
D) ल्युपिन
2) कोणत्या कंपनीने ‘एशियामनी’ या संस्थेकडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान प्राप्त केला?
A) TCS
B) कॉग्नीझंट
C) इन्फोसिस
D) टेक महिंद्रा
3) कोणत्या बँकेनी अग्र दहा मौल्यवान स्थानिक कंपन्यांच्या यादीत बजाज फायनान्स या कंपनीची जागा घेतली?
A) HDFC बँक
B) अॅक्सिस बँक
C) भारतीय स्टेट बँक
D) पंजाब नॅशनल बँक
4) ऊर्जा व जैव-इंधनांच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी कोणत्या संस्थेनी EMRE कंपनीसोबत करार केला?
A) IIM अहमदाबाद
B) IIT मुंबई
C) IIT मद्रास
D) IIT कानपूर
5) ________ या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.
A) 15 ऑक्टोबर
B) 16 ऑक्टोबर
C) 17 ऑक्टोबर
D) 18 ऑक्टोबर
6) एयर इंडिया ही प्रवासीसह ए-320 विमानासाठी रोबॉट तंत्रज्ञानावर आधारित असलेले “_______” वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली.
A) टॅक्सीबॉट
B) ITACBot
C) FRAnny
D) रादा रोबोट
7) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?
A) नवी दिल्ली
B) मुंबई
C) हैदराबाद
D) बेंगळुरू
8) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून कोणता अहवाल प्रसिद्ध केला जात नाही?
A) ह्यूमन डेव्हलपमेंट रीपोर्ट
B) ग्लोबल फायनॅनष्यल स्टेबिलिटी रीपोर्ट
C) वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक
D) एक्सटर्नल सेक्टर रीपोर्ट
उत्तरे
1. (B) मायलान
मायलान या औषधीनिर्माता कंपनीने औषधी-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध तयार केले आहे. हे औषध ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) याच्या सहकार्याने अमेरिकेमध्ये तसेच भारतीय बाजारपेठेत आणले जाणार आहे.
2. (A) TCS
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने ‘एशियामनी’ या संस्थेकडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान प्राप्त केला.
3. (C) भारतीय स्टेट बँक
अद्ययावत अग्र दहा मौल्यवान स्थानिक कंपन्यांच्या यादीत भारतीय स्टेट बँकेनी (SBI) बजाज फायनान्स या कंपनीला मागे टाकत त्याची जागा घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही देशातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ TCS, HDFC बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, ITC, ICICI बँक या कंपन्या आहेत.
4. (C) IIT मद्रास
ऊर्जा व जैव-इंधनांच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास या संस्थेनी आणि एक्झोनमोबिल रिसर्च अँड इंजिनीअरिंग (EMRE) या कंपनीसोबत करार केला आहे.
5. (B) 16 ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (UN FAO) या संघटनेच्या नेतृत्वात 16 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. अन्न सुरक्षा आणि सर्वांसाठी पौष्टिक आहार याविषयी जागतिक जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे.
6. (A) टॅक्सीबॉट
एयर इंडिया ही विमानांसाठी “टॅक्सीबॉट” (अर्थात टॅक्सी रोबॉट) वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी आहे. एयर इंडियाने दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे ए-320 विमानासाठी टॅक्सीबॉटचा वापर केला. टॅक्सीबॉट हे पार्किंग ते धावपट्टी आणि त्याउलट विमानाची टॅक्सीसारखी वाहतूक करण्यासाठी वापरलेले जाणारे रोबॉट एयरक्राफ्ट ट्रॅक्टर होय.
7. (A) नवी दिल्ली
14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2019 या काळात नवी दिल्लीत ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन सेल्युलर ऑपरेशन असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) सह दूरसंचार विभागाने केले.
8. (A) ह्यूमन डेव्हलपमेंट रीपोर्ट
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून ‘ह्यूमन डेव्हलपमेंट रीपोर्ट’ अहवाल प्रसिद्ध केला जात नाही; तो अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून तयार केला जातो.
No comments