Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 11 October 2019

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ‘ई-दंत सेवा’ संकेतस्थळ : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुख-आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्…

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ई-दंत सेवा’ संकेतस्थळ :
  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुख-आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे.
  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2019 रोजी ई-दंत सेवा’ या नावाने एक संकेतस्थळ आणि एका मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेत्रहीन व्यक्तींसाठी देखील याच्यासंदर्भात ब्रेल लिपीत एक पुस्तिका आणि ध्वनीफिती प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला आणि बालकांसाठी एका पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
  •  ‘ई-दंत सेवा’ हे पहिले-वहिले राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ आहेज्याद्वारे मुखा-संबंधी आरोग्याविषयी माहिती प्रदान केले जाते. अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) आणि इतर भागधारकांसह मंत्रालयाच्या या पुढाकाराने मुखासंबंधी आरोग्य राखण्याविषयी महत्त्व लोकांना समजून घेण्यास मदत होणार आहे.

रसायनशास्त्रामधले नोबेल पारितोषिक 2019 :
  • 2019 या वर्षासाठीचे रसायनशास्त्रामधले नोबेल पारितोषिक जॉन गुडइनफ (अमेरिका)स्टेनली व्हिटिंघम (अमेरिका) आणि अकिरा योशिनो (जापान) या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे.
  • हे तीन शास्त्रज्ञ पुरस्काराची 90 लक्ष स्वीडिश क्रोनोर (914000 डॉलर) रक्कम आपापसात वाटून घेणार. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेनी हा पुरस्कार जाहीर केला. 10 डिसेंबरला एका औपचारिक समारंभात नोबेल विजेत्यांचा सन्मान केला जाणार.
  • 97 वर्षीय जॉन गुडइनफ हे अमेरिकेत प्राध्यापक असून या वयात पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय स्टॅनली व्हिटिंघम इंग्लिश-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ असून ते सध्या बिंगम्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अकिरा योशिनो जापानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लिथियम-आयन बॅटरीचा अविष्कार केला आहे.
  • पुन्हा रिचार्ज होणाऱ्याहलक्या आणि शक्तीशाली लिथियम-आयन बॅटरीचा वापर आता मोबाईल फोनलॅपटॉपपासून ते इलेक्ट्रॉनिक वाहनांपर्यंत केला जातो. यामुळे सौर आणि पवन ऊर्जा संग्रहित करणेही शक्य होत आहेज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होत आहे.

WHO इंडिया कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी 2019-2023 :
  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘WHO इंडिया कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी 2019-2023: ए टाइम ऑफ ट्रान्झिशन’ या शीर्षकाखाली एक दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
  • कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी (CCS) दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी आरोग्य क्षेत्रातली ध्येये साध्य करण्याच्या दिशेनी भारत सरकारबरोबर कार्य करण्यासाठी एक पथदर्शी मार्ग प्रदान करते.
  • देशासह WHOच्या धोरणात्मक सहकार्यासाठी चार क्षेत्र ओळखले गेले आहेतते म्हणजे 
1) सार्वजनिक आरोग्य सेवेच्या प्रगतीस गती देणे;
2) आरोग्याच्या निर्धारकांना उद्देशून आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे;
3) आरोग्याविषयक आणीबाणीच्या विरोधात नागरिकांचे रक्षण करणे;
4) आरोग्यविषयक क्षेत्रात भारताचे जागतिक नेतृत्व वाढविणे.

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : मेरीचे आठवे जागतिक पदक!
  • बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी बॉक्सर म्हणून मेरी कोमने नावलौकिक मिळवला आहे.
  • सर्वाधिक जागतिक पदके पटकावणारी पहिली बॉक्सरमंजूजमुनालव्हलिना यांचाही उपांत्य फेरीत प्रवेश उलान-उदे (रशिया) : सहा वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणारी एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिने गुरुवारी आपल्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा रोवला.
  • महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी बॉक्सर म्हणून मेरी कोमने नावलौकिक मिळवला आहे. उपांत्य फेरीत धडक मारत मेरी कोमने आपले आठवे पदक निश्चित केले.
  • मेरी कोमसह सहावी मानांकित मंजू राणी (४८ किलो)जमुना बोरो (५४ किलो) आणि गेल्या वेळची कांस्यपदक विजेती तिसरी मानांकित लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठत भारताचे किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.

No comments