Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या व्यक्तीला इटलीमध्ये व्हॅटिकनच्यावतीने 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
A) अजय बंगा
B) मुहम्मद युनुस
C) अफ्रोझी युनुस
D) वेरा फोरोस्टेन्को
2) खालीलपैकी कोणता चंद्रयान-2 मोहिमेचा भाग नाही?
A) लुनार ऑर्बिटर
B) विक्रम लँडर
C) प्रज्ञान रोव्हर
D) द्रुष्टी दुर्बिण
3) सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठक मंत्री बैठक कुठे आयोजित केली गेली?
A) थायलंड
B) मलेशिया
C) म्यानमार
D) भारत
4) जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारताचा कोणता क्रमांक आहे?
A) 25
B) 34
C) 35
D) 24
5) कोणता देश जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत प्रथम स्थानी आहे?
A) जापान
B) स्पेन
C) फ्रान्स
D) जर्मनी
6) दक्षिण आशियातल्या कोणत्या देशाला 3 सप्टेंबर 2019 रोजी जागतिक पशू-आरोग्य संघटनेनी (OIE) एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) या विषाणूपासून मुक्त असल्याचे घोषित केले?
A) भारत
B) बांग्लादेश
C) नेपाळ
D) पाकिस्तान
उत्तरे
1. (B) मुहम्मद युनुस
बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला. शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.
2. (D) द्रुष्टी दुर्बिण
22 जुलै 2019 रोजी ISROने चंद्रयान-2 अवकाशात सोडले होते. चंद्रयान-2 साठी चंद्रावर गेलेले यान 3800 किलो वजनाचे आहे. याच्या निर्मितीसाठी 603 कोटी रूपये लागले होते. तर प्रक्षेपणासाठी 375 कोटी रूपयांचा खर्च आला. या मोहिमेत चंद्रावर उतरत असताना लँडर विक्रमचा संपर्क तुटल्याने मोहीम आंशिक अयशस्वी ठरली. मात्र, ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे चंद्राच्या परिक्रमा करून त्याचे निर्धारित काम करतो आहे आणि तो 1 वर्ष सक्रिय राहील. ‘चांद्रयान-२’ मोहीम पूर्ण यशस्वी झाली असती तर चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला असता. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे. परंतु दुसर्या दिवशीच लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर पाहिला गेला आणि त्याच्याशी संपर्क स्थापित करण्यासाठी ISRO कार्य करीत आहे.
3. (A) थायलंड
दिनांक 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) औपचारिकपणे सन 2012 मध्ये लागू झाले.
4. (B) 34
जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.
5. (B) स्पेन
जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.
6. (A) भारत
3 सप्टेंबर रोजी जागतिक पशू-आरोग्य संघटनेनी (OIE) भारताला एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) या विषाणूपासून मुक्त असल्याचे घोषित केले. गेल्या दोन वर्षांत ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले होते. आता दुसरा उद्रेक होईपर्यंत हा दर्जा कायम राहणार.
No comments