तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात उभारले: तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात लक्कमपल्ली (नंदिपेठ मंडल) येथे उभारण्यात आले असून त्याचे 7 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद…
तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात उभारले :
- तेलंगणा राज्यातले पहिले मेगा फूड पार्क निझामाबाद जिल्ह्यात लक्कमपल्ली (नंदिपेठ मंडल) येथे उभारण्यात आले असून त्याचे 7 सप्टेंबर 2019 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
- ‘स्मार्ट अॅग्रो फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा हा मेगा फूड पार्क उभारल्यामुळे निजामाबाद, निर्मल, जगतील, राजन्ना सिर्सीला कामारेड्डी तसेच महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल. हे मेगा फूड पार्क 78 एकरच्या जागेवर 108.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे.
- भारत सरकारच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मेगा फूड पार्क योजनेच्या अंतर्गत प्रत्येक मेगा फूड पार्क प्रकल्पाला 50 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते. मेगा फूड पार्क ही योजना "समूह" पध्दतीवर आधारित आहे. पार्कमध्ये विशेषत: पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा, ज्यामध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी आणि उद्योजकांसाठी 30-35 पूर्ण विकसित भूखंडासकट अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय असते. मेगा फूड पार्क प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) कडून व्यवस्थापीत केले जाते, जे कंपनी कायद्याच्या अंतर्गत नोंदणीकृत कॉर्पोरेट मंडळ असते.
मालदीवमध्ये चौथी ‘हिंद महासागर परिषद’ संपन्न
- मालदीव या देशाची राजधानी माले या शहरात 3 आणि 4 सप्टेंबर 2019 रोजी ‘हिंद महासागर परिषद 2019’ पार पडली. "हिंद महासागर प्रदेश सुरक्षित करणे: पारंपारिक आणि पारंपारिक आव्हाने" या विषयाखाली ही परिषद भरविण्यात आली होती.
- मालदीव सरकार आणि सिंगापूरचे एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिया फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत भारताच्यावतीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.
रशीद खानने केली इम्रान खानच्या विक्रमाशी बरोबरी :
- बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर 224 धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. या विजयासह कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून सर्वात कमी कालावधीत दुसरा कसोटी विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी अफगाणिस्तानने बरोबरी केली.
- बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ 205 धावाच करता आल्या. कसोटी कारकिर्दीतील सर्वात तरूण कर्णधार ठरलेल्या रशीद खानने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात 11 गड्यांना अडकवले.
- त्यासोबत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्या एकाच कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी आणि 10 हून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय, कर्णधार म्हणून खेळताना पहिल्यावहिल्या सामन्यातच अशी कामगिरी करणारा रशीद पहिलाच खेळाडू ठरला.
हरित कवच २ कोटी ६० लाख हेक्टरने वाढवण्याचे लक्ष्य :
- पुढील दहा वर्षांमध्ये २ कोटी ६० लाख हेक्टर इतकी प्रचंड जमीन पुन्हा हरित केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. जगभर नापीक होत असलेल्या जमिनींमागे पाण्याचा अभाव हेही प्रमुख कारण असून त्यावर पर्याय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर जलकृती आराखडा तयार करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
- हवामानातील बदलामुळे विपरीत परिणाम, जैववैविधतेचा ऱ्हास आणि जमिनींचे नापिकीकरण अशा पर्यावरणविषयक तीन समस्या भेडसावत आहेत. त्यापैकी नापीक जमीन सुपीक करणे, जंगले पुनप्र्रस्तापित करणे, दुष्काळ निवारण अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर दिल्लीतील जागतिक परिषदेत चर्चा केली जात आहे. या संदर्भात ‘दिल्ली ठराव’ संमत केला जाणार आहे. त्यासाठी ७०हून अधिक देशांच्या मंत्र्यांची दोन दिवसांची बैठक होत आहे. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या (यूएनसीसीडी) अंतर्गत होत असलेल्या या जमीन सुधारविषयक जागतिक परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते.
- २०१५-१७ या दोन वर्षांत भारताचे हरित कवच ८ लाख हेक्टरने वाढले असल्याचे मोदी म्हणाले. भारताने जमीन सुधार कार्यक्रमासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दक्षिणेकडील देशांना साह्य़ करण्याचे धोरण भारताने कायम ठेवलेले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे उपग्रह तंत्रज्ञान देऊन भारत मित्र देशांना सहकार्य करेल, अशी ग्वाहीही मोदी यांनी दिली.
सेरेना विल्यम्सला नमवत कॅनडाची बियान्का आंद्रेस्कू ठरली अमेरिकन ओपनची नवी चॅम्पियन :
- कॅनडाच्या एकोणीस वर्षांच्या बियान्का आंद्रेस्कूनं अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरुन नवा इतिहास घडवला आहे. बियान्कानं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं आव्हान 6-3, 7-5 असं मोडून काढलं. कारकीर्दीतील 24व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे स्वप्न मात्र यंदा भंगलं आहे.
- पंधरावी मानांकित बियान्का यंदा पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये दाखल झाली होती. गेली दोन वर्षे तिला पात्रता फेरीतच अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच बियान्काने यंदा पदार्पणात अमेरिकन ओपन जिंकण्याची कामगिरी बजावली. गेल्या 13 वर्षांत अमेरिकन ओपन जिंकणारी ती सर्वात अल्पवयीन टेनिसपटूही ठरली.
- ग्रँड स्लॅम जिंकणारी बियान्का आजवरची पहिली कॅनेडियन नागरिक ठरली आहे. तर 2000 साली म्हणजे नव्या सहस्रकात जन्मलेली ती पहिली ग्रँड स्लॅम चॅम्पियन ठरली आहे.
No comments