Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार ऑगस्ट 2019 या महिन्यामध्ये वस्तू व सेवा कराचे (GST) किती संकलन झाले?
A) रु. 1.02 लक्ष कोटी
B) रु. 17,733 कोटी
C) रु. 98,202 कोटी
D) रु. 48,958 कोटी
2) कोणत्या भारतीय नेमबाजाने ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
A) यशस्वीनी देसवाल
B) ईशा सिंग
C) करनी सिंग
D) निशिता चौकी
3) 1 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या फेरबदलात राष्ट्रपतींनी राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसाठी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यासंदर्भात चुकीची ‘राज्य-राज्यपाल’ जोडी शोधा.
A) राजस्थान - कलराज मिश्रा
B) महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
C) हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
D) केरळ - तमिलीसाई सौंदराराजन
4) कोणता संघ 15 वर्षाखालील SAFF चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता आहे?
A) म्यानमार
B) पाकिस्तान
C) भारत
D) नेपाळ
5) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञान कंपनीबरोबर भागीदारी केली आहे?
A) गुगल
B) मायक्रोसॉफ्ट
C) अॅमेझॉन
D) फेसबुक
उत्तरे
1. (C) रु. 98,202 कोटी
ऑगस्ट महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन 1 लक्ष कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यातले GST संकलन 98,202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लक्ष कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमी भरले.
2. (A) यशस्वीनी देसवाल
भारतीय नेमबाज यशस्वीनी सिंग देसवाल हिने रिओ दि जानेरो येथे ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत महिला गटात 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने देशाच्यावतीने टोकियो 2020 मध्ये प्रवेश मिळविला.
3. (D) केरळ - तमिलीसाई सौंदराराजन
1 सप्टेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा या राज्यांसाठी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. त्यानुसार, राजस्थान - कलराज मिश्रा; महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी; हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय; केरळ - आरिफ मोहम्मद खान; तेलंगणा - तमिलीसाई सौंदराराजन
4. (C) भारत
भारत हा 15 वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) चषक 2019 फूटबॉल स्पर्धेचा विजेता ठरला. कल्याणी (पश्चिम बंगाल) येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळला पराभूत केले.
5. (A) गुगल
31 ऑगस्ट 2019 रोजी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "बिल्ड फॉर डिजिटल इंडिया" उपक्रम राबविण्यासाठी गुगल या कंपनीबरोबर भागीदारी केली. हा कार्यक्रम अभियांत्रिकी अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये बाजारपेठेसाठी तयार असे तंत्रज्ञानावर आधारित असलेले उपाय विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणार.
No comments