ऑगस्ट 2019 महिन्यात 98,202 कोटी रुपयांचे GSTसंकलन झाले: ऑगस्ट महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन 1 लक्ष कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ऑगस्ट महिन्यातले …
ऑगस्ट 2019 महिन्यात 98,202 कोटी रुपयांचे GST संकलन झाले :
- ऑगस्ट महिन्यातले वस्तू व सेवा कर (GST) संकलन 1 लक्ष कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ऑगस्ट महिन्यातले GST संकलन 98,202 कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते 4.51 टक्के अधिक असले, तरी मासिक एक लक्ष कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमी भरले.
- जुलै महिन्यात केंद्रीय GST महसुलाची रक्कम 17,733 कोटी रुपये, राज्य GSTची रक्कम 24,239 कोटी रुपये आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) GSTची रक्कम 48,958 कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या 24,818 कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम 7,273 कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या 841 कोटी रुपयांसह) इतकी होती.
- जून-जुलै 2019 या काळात GST संकलनातली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 27,955 कोटी रुपये अदा केले गेले.
आधार क्रमांकाच्या मदतीने विवरणपत्र भरणाऱ्यांना आपोआप ‘पॅन’ मिळण्यास सुरुवात :
- कुठल्याही करदात्याने आधार क्रमांक टाकून कर विवरण पत्र भरल्यास त्याला आपोआप कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन क्रमांक देण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने आता दिली आहे. ती 1 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, त्यामुळे पॅन क्रमांकासाठी आता वेगळी खटपट करावी लागणार नाही.
- पॅन व आधार या दोन माहिती संचांची जोडणी केली असल्याने जेव्हा एखादी व्यक्ती आधार क्रमांक टाकून विवरण पत्र भरेल तेव्हा आपोआप आधारमधील माहिती घेऊन त्या व्यक्तीचा पॅन क्रमांक तयार होईल. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 30 ऑगस्ट रोजी जारी केली आहे.
- पॅन क्रमांकासाठी कुठलीही वेगळी कागदपत्रे करदात्याला सादर करावी लागणार नाहीत. हा नियम 1 सप्टेंबरपासून अमलात आला आहे. कर विभागाने आधार म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती घेतली असून त्याआधारे पॅन क्रमांक जारी केला जाणार आहे.
मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम :
- श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने रविवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलिंगाने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला.
- २०११मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा मलिंगा जुलै महिन्यात कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने पहिल्याच षटकात कॉलिन मुन्रोचा त्रिफळा उडवून आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मग कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.
‘चांद्रयान-२’मधून लँडर यशस्वीपणे विलग :
- ‘चांद्रयान-२’ मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. यानातील ‘विक्रम’ हे लँडर (चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाणारा भाग) ऑर्बिटरपासून सोमवारी यशस्वीपणे विलग झाले. यामुळे आता सर्वाचे लक्ष ७ सप्टेंबरकडे लागले आहे.
- सुमारे एक तासाच्या उत्कंठावर्धक प्रयत्नानंतर ‘विक्रम’ हे लँडर सोमवारी दुपारी सव्वा वाजता मूळ यान म्हणजे ऑर्बिटरपासून वेगळे झाले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी दिली. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी दोन प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी आधी त्याचा वेग कमी करत न्यावा लागेल, नंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. लँडरला भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
- लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला रात्री १.५५ वाजता उतरणार आहे. ते उतरवण्याआधीचा पंधरा मिनिटांचा थरार महत्त्वाचा आहे. त्यातून लँडर अलगदपणे चांद्रभूमीवर उतरले तर ती भारताची मोठी कामगिरी असेल. त्यानंतर त्यातून प्रज्ञान हे रोव्हर बाहेर येईल, त्यासाठी चार तासांचा कालावधी लागेल.
- रोव्हर बाहेर आल्यानंतर त्यावरील वैज्ञानिक उपकरणे कार्यान्वित होणार असून, ती चंद्रावरील माती आणि अन्य बाबींचे परीक्षण करतील. लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास अशी मोहीम साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती :
- 1 सप्टेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, तेलंगणा या राज्यांसाठी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
1) राजस्थान - कलराज मिश्रा
2) महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
3) हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
4) केरळ - आरिफ मोहम्मद खान
5) तेलंगणा - तमिलीसाई सौंदराराजन
- ज्या राज्याच्या राज्यपालांचा कार्यकाळ संपला आहे त्या राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यानंतर आता त्यांच्याजागी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2001-2002 या काळात कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सन 2002-2007 या कालावधीत त्यांनी विधानसभेचे विरोधीपक्षनेते पद सांभाळले. सन 2008-2014 या कालावधीत ते राज्यसभेचे खासदार होते.
No comments