हैदराबादमध्ये 5वी ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया’ प्रदर्शनी भरली : यंदा तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या शहरामध्ये ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया 2019’ ही मत्स्यप्रदर्शनी भरविण्यात आली.31 ऑगस्ट 2019 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्य…
- यंदा तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या शहरामध्ये ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया 2019’ ही मत्स्यप्रदर्शनी भरविण्यात आली.
- 31 ऑगस्ट 2019 रोजी भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी त्या मत्स्यप्रदर्शनीचे उद्घाटन केले. ही प्रदर्शनी तीन दिवस चालली.
- ‘अॅक्वा अॅक्वेरिया इंडिया’ ही भारतात भरविण्यात येणारी आंतरराष्ट्रीय मत्स्यप्रदर्शनी आहे, जिचे आयोजन सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) या संस्थेच्यावतीने केले जाते.
- भारत हा जगातला द्वितीय क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये भारताने 13.70 दशलक्ष मेट्रिक टन वजनी माशाचे उत्पादन घेतले. भारताला लाभलेली 7516.6 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आणि 3.9 दशलक्ष मेट्रिक टन वजनी क्षमतेचे मत्स्यपालन केले जाऊ शकणार्या सागरी स्त्रोतांसह भारतात समृद्ध विविधता असलेले विशाल सागरी स्त्रोत आहेत.
भारतातला सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा आंध्रप्रदेश राज्यात :
- 1 सप्टेंबर 2019 रोजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आंध्रप्रदेश राज्यात देशातल्या सर्वाधिक लांबी असलेल्या विद्युतीकृत रेल बोगद्याचे उद्घाटन केले.
- आंध्रप्रदेश राज्याच्या चेरलोपल्ली आणि रापुरू या स्थानकांच्यादरम्यान तयार करण्यात आलेला हा 6.6 किलोमीटर लांबीचा बोगदा ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम रेलमार्गाचा एक भाग आहे. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरुन 'घोड्याची नाल'च्या आकारात बनविला गेला आहे. बोगद्याची उंची 6.5 मीटर एवढी आहे.
- नव्याने बांधण्यात आलेला हा बोगदा कृष्णापट्टनम बंदर आणि दुर्गम भागांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी अखंड रेल जोडणी प्रदान करणार आहे.
- ओबुलावरीपल्ली-व्यंकटाचलम दरम्यानच्या 112 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे प्रवासाची वेळ 5 तासांनी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या, गाडीला कृष्णापट्टनम बंदर ते ओबुलावरीपल्ली पर्यंत जाण्यासाठी 10 तास लागतात.
राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धात अरपिंदर सिंगला सुवर्णपदक :
- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा भारताचा तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंग याने 59व्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पार करण्यात तो अपयशी ठरला. तर अरपिंदरने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत 16.83 मीटर इतकी उडी मारली.
- मात्र पीएसी स्टेडियमवरील अतिउष्ण आणि दमट वातावरणात तो जागतिक स्पर्धेचा 16.95 मीटरचा पात्रता निकष पार करण्यासाठी 12 सेंमी इतका कमी पडला. तसेच कर्नाटकच्या यू. कार्तिक आणि तामिळनाडूच्या मोहम्मद सलाहुद्दीन यांनी अनुक्रमे 16.80 मीटर आणि 16.79 मीटर इतकी कामगिरी करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.
मिताली राजने जाहीर केली टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती :
- भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मिताली राजने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्त्व केलं.
- यामध्ये 2012 (श्रीलंका), 2014 (बांगलादेश) आणि 2016 (भारत) या तीन टी-20 विश्वचषकांचा समावेश आहे. मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
अमेरिकेच्या F-35 ला टक्कर देणार रशियाचं Su-57E फायटर विमान :
- रशियाने एमएकेएस इंटरनॅशनल एअर शो मध्ये पाचव्या पिढीचे Su-57E हे अत्याधुनिक फायटर विमान सादर केले आहे. या विमानाची टक्कर अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ विमानाबरोबर असणार आहे. Su-57E या विमानाची अन्य देशांना विक्री करणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. सुखोईने Su-57E विमान विकसित केले आहे.
- हवा आणि जमिनीवरील विविध टार्गेटसचा लक्ष्यभेद करणारे Su-57E हे पाचव्या पिढीचे एक बहुउपयोगी विमान आहे. दिवसा-रात्री, कुठल्याही वातावरणात या विमानाचा वापर केला जाऊ शकतो. चौथ्या पिढीच्या फायटर विमानाशी तुलना करता रडारला चकवा देणारे स्टेल्थ तंत्रज्ञान या फायटर विमानामध्ये आहे.
- शत्रूच्या रडारवर हे विमान सापडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे अधिक सोपे होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्राची सिस्टिम आणि सुपरसॉनिक वेग Su-57E ला अधिक घातक बनवते. 29 जानेवारी, 2010 साली Su-57E ने पहिले उड्डाण केले होते.
No comments