Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) ______________ ह्याने IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत 150-अप फॉर्मेटचा अंतिम सामना जिंकून त्याचे 22वे विजेतेपद जिंकले.
A) कार्लो बियाडो
B) जेसन शॉ
C) चांग जून-लिन
D) पंकज अडवाणी
2) कोणती व्यक्ती ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करणारी प्रथम भारतीय आणि जगातली 44 वी व्यक्ती आहे?
A) संजय पुरी
B) मयंक वैद
C) असद उल्ला खान
D) शॉन रे चौधरी
3) कोणत्या व्यक्तीची हरियाणाच्या सोनीपत शहरातल्या राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली?
A) कपिल देव
B) सुनील गावस्कर
C) रवी शास्त्री
D) गौतम गांगुली
4) कोणत्या संघटनेनी गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला?
A) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)
B) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)
C) आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)
D) जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)
5) LRO याचे पूर्ण नाव काय आहे?
A) लुनार रिवॉल्विंग ऑर्बिटर
B) लोकल रिकोनैसेन्स ऑर्बिटर
C) लेव्हल रिकोनैसेन्स ओझोन
D) लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटरउत्तरे
1. (D) पंकज अडवाणी
म्यानमारमध्ये IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2019 या स्पर्धेत 150-अप फॉर्मेटचा अंतिम सामना पंकज अडवाणीने जिंकला. हे त्याचे 22 वे विजेतेपद आहे.
2. (B) मयंक वैद
जगातली सर्वाधिक खडतर अशी ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करून मयंक वैदने नवा विश्वविक्रम केला आहे. 42 वर्षांचा मयंक वैद ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू ठरला. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती जगातली 44 वी व्यक्ती आहे.
3. (A) कपिल देव
हरियाणा राज्य सरकारने सोनीपत शहरातल्या राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून कपिल देव ह्यांची नेमणूक केली आहे.
4. (A) संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या विक्रम लँडरसोबत संपर्क स्थापित करण्याच्या प्रयत्नासाठी NASAची लुनार रिकोनैसेन्स ऑर्बिटर (LRO) ही चंद्रमोहीम 17 सप्टेंबर 2019 रोजी पाठविण्यात आली.
No comments