एयरटेल पेमेंट्स बँकेचा नवा ‘भरोसा बचत खाता’ : एयरटेल पेमेंट्स बँकेनी 'भरोसा बचत खाता' या शीर्षकाखाली नवे बचत खाते सादर केले आहे.या खात्याच्या ग्राहकांना बँकेच्या देशभरातल्या 6.5 लक्षाहून जास्त संख्येनी असलेल्या आधार-एनेबल …
एयरटेल पेमेंट्स बँकेचा नवा ‘भरोसा बचत खाता’ :
- एयरटेल पेमेंट्स बँकेनी 'भरोसा बचत खाता' या शीर्षकाखाली नवे बचत खाते सादर केले आहे.
- या खात्याच्या ग्राहकांना बँकेच्या देशभरातल्या 6.5 लक्षाहून जास्त संख्येनी असलेल्या आधार-एनेबल पेमेंट सिस्टम (AePS) केंद्रांवर रोख रक्कम काढता येणार, रक्कम तपासता येणार आणि खात्याचे मिनी स्टेटमेंट मिळविता येणार. याव्यतिरिक्त ग्राहकाला 5 लक्ष रूपयांचा मोफत अपघाती विमा दिला जाणार आहे.
- एयरटेल पेमेंट्स बँक देशभरातल्या 5 लक्ष बँकिंग केंद्रांच्या जाळ्याद्वारे ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा पुरविते.
नासाने पाठवला 'विक्रम' ला रेडिओ संदेश :
- नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्क (DSN)च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून विक्रमला एक रेडिओ संदेश पाठवला आहे. इस्रोने दिलेल्या प्री-लाँच अनुमानानुसार, विक्रमला केवळ एक चांद्र दिवसासाठी (म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस) सूर्याचा थेट प्रकाश मिळणार आहे. म्हणजेच पृथ्वीवरील केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे.
- परिणामी हे १४ दिवस संपर्काचे सर्व प्रयत्न सुरू राहतील. १४ दिवसांनंतर एक मोठी काळी रात्र चंद्रावर असेल तीही अर्थात पुढील १४ दिवस असेल. विक्रमची लँडिंग यशस्वी झाली असती तरी तो केवळ १४ दिवसच तेथे काम करू शकणार होता. अशात येत्या २० ते २१ सप्टेंबरपर्यंत जर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही तर संपर्काच्या सर्व आशा मावळतील.
राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा :
- शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी, उर्दू , हिंदी आणि गुजराती भाषेतही प्रकाशित होते.
- जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते. यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे.
- या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय वंशाच्या लोकांनी सर्वाधिक संख्येनी स्थलांतरण केले: संयुक्त राष्ट्रसंघ
- संयुक्त राष्ट्रसंघाने ‘इंटरनॅशनल मायग्रेंट स्टॉक 2019’ हे शीर्षक असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्थलांतरणाविषयीची माहिती देण्यात आली आहे. आज विविध कारणांमुळे लोक परदेशात वास्तव्य करताना आढळून येते.
- अहवालाच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्थलांतरित लोकांमध्ये 2019 साली भारतीय नागरिकांची सर्वाधिक संख्या असून आज 17.5 दशलक्ष भारतीय वंश असलेले नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत आणि या संख्येच्या बाबतीत भारत हा सर्व देशांमध्ये अग्रगण्य देश ठरला आहे.
- भारतापाठोपाठ द्वितीय क्रमांकावर मेक्सिको (11.8 दशलक्ष), त्यानंतर चीन (10.7 दशलक्ष), रशिया (10.5 दशलक्ष), सिरिया (8.2 दशलक्ष), बांग्लादेश (7.8 दशलक्ष), पाकिस्तान (6.3 दशलक्ष), युक्रेन (5.9 दशलक्ष), फिलिपिन्स (5.4 दशलक्ष) आणि अफगाणिस्तान (5.1 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो आहे. या पहिल्या 10 देशांमधून सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी एक तृतीयांश लोक परदेशात आहेत.
- एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली. सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत. त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती. सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.
- सरकारने एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची हवाई दल प्रमुखपदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे.
- एअर फोर्स प्रमुख पदावर पोहोचण्याआधी त्यांनी अन्य महत्वाच्या पदांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. जॅग्वार स्क्वाड्रनचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
No comments