Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) 29 ऑगस्ट 2019 रोजी आशियाई विकास बँक (ADB) याच्या अध्यक्षांनी भारत सरकारच्या नवीन प्रमुख उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सन 2020 ते सन 2022 या काळात _______ हून अधिकचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले.
A) 12 अब्ज डॉलर
B) 22 अब्ज डॉलर
C) 32 अब्ज डॉलर
D) 52 अब्ज डॉलर
2) इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?
A) 5 वा
B) 18 वा
C) 9 वा
D) 22 वा
3) इप्सोस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याच्या हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणता देश अग्रस्थानी आहे?
A) ऑस्ट्रेलिया
B) ग्रेट ब्रिटन
C) कॅनडा
D) (A) आणि (C)
4) भारतातले सर्वाधिक उंचीवर उभारलेले स्काय सायकलिंग ट्रॅक कुठे बांधण्यात आला आहे?
A) मनाली
B) लेह
C) लाहौल
D) स्पीती
5) कोणत्या भारतीय खेळाडूला पहिल्या-वहिल्या AIPS एशिया पुरस्कार सोहळ्यात महिला गटात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू’ म्हणून गौरविण्यात आले?
A) पी. व्ही. सिंधू
B) स्मृती मंधाना
C) हरमनप्रीत कौर
D) मेरी कोम
6) कोणत्या खेळाडूने AIPS एशिया पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू (पुरुष)’ पुरस्कार जिंकला आहे?
A) हॅरी केन
B) की सुंग-युएंग
C) सोन हेउंग
D) मोहम्मद सालाह
उत्तरे
1. (A) 12 अब्ज डॉलर
29 ऑगस्ट 2019 रोजी आशियाई विकास बँक (ADB) याचे अध्यक्ष ताकेहिको नाकाओ यांनी भारत सरकारच्या नवीन प्रमुख उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सन 2020 ते सन 2022 या काळात 12 अब्ज डॉलरहून अधिकचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले.
2. (C) 9 वा
इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.
3. (D)- (A) आणि (C)
इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.
4. (A) मनाली
हिमाचल प्रदेशाच्या मनाली शहरात गुलाबा येथे समुद्रसपाटीपासून 9,000 फूट उंचीवर 350 मीटर लांबी असलेला स्काय सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. हा भारतातला सर्वाधिक उंचीवर उभारलेला स्काय सायकलिंग ट्रॅक आहे. मनालीमधील अटलबिहारी वाजपेयी पर्वतारोहण क्रिडा संस्थेनी हा मार्ग तयार केला.
5. (D) मेरी कोम
भारताची मुष्ठियोद्धा मेरी कोम यांना पहिल्या-वहिल्या एशियन स्पोर्ट्सरायटर्स युनियन (AIPS एशिया) पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू (महिला)’ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
6. (C) सोन हेउंग
पहिल्या-वहिल्या एशियन स्पोर्ट्सरायटर्स युनियन (AIPS एशिया) पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्तम आशियाई खेळाडू (पुरुष)’ पुरस्कार सोन हेउंग (दक्षिण कोरिया) ह्याला दिला गेला.
No comments