राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, यादीत 3.11 कोटी नागरिकांचा समावेश : आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली. NRCच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंतिम य…
राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी जाहीर, यादीत 3.11 कोटी नागरिकांचा समावेश :
- आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली. NRCच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या अंतिम यादीत 3,11,21,004 नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे तर 19,06,657 नागरिकांना यादीतून वगळण्यात आले आहे.
- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या या यादीमुळे अनेकांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. कारण या यादीतून आसाममधल्या त्या नागरिकांना वेगळे केळे जाईल ज्यांनी 1971 सालानंतर बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश केला होता.
- गृहमंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, NRCमध्ये नाव समाविष्ठ नसलेल्या एखाद्या व्यक्तीला परदेशी ठरवळे जाणार नाही. ज्या नागरिकांची नावे प्रस्तावित NRCमधून वगळण्यात आली आहेत त्यांना अपील करण्याची संधी मिळेल.
स्टार्टअप उद्योगांसाठी CBDTने ‘स्टार्ट-अप कक्ष’ तयार केले :
- 31 ऑगस्ट 2019 रोजी स्टार्ट-अप उद्योगांच्या प्रकरणाबाबत करविषयक तक्रारींचे निवारण आणि संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) एका ‘स्टार्ट-अप कक्ष’ (Start-up Cell) याची स्थापना केली.
- स्टार्ट-अप उद्योगांच्या मूळ अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने CBDTने हा निर्णय घेतला. हे समर्पित कक्ष ‘आयकर कायदा-1961’ याच्या प्रशासनाच्या संदर्भात स्टार्ट-अप संस्थांच्या बाबतीत कर-संबंधीत तक्रारींचे निवारण आणि अडचणी दूर करण्यासाठी कार्य करणार आहे.
ऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित :
- यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.
- 22 वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत 236.7 गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने 234.8 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने 215.7 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद :
- टी-20 आणि वन-डे मालिकेत बाजी मारल्यानंतर भारताने कसोटी मालिकेवरही भारताने आपलं वर्चस्व प्राप्त केलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर जमैका कसोटीतही भारताने विंडीजला बॅकफूटवर ढकललं आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी 468 धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे.
- दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1-1 बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. मोहम्मद शमीने या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या 42 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.
- सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये बळींचं दीड शतक साजरं करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी आता तिसऱ्या स्थानावर आहे. शमीने झहीर खान आणि इशांत शर्मा यांना मागे टाकलं आहे. या यादीमध्ये कपिल देव आणि जवागल श्रीनाथ हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
मनोज नरवणे यांनी स्वीकारली लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे :
- लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज लष्कर उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर वरिष्ठ कमांडंट या नात्याने पदाच्या शर्यतीत नरवणे आघाडीवर असणार आहेत. तसेच लेफ्टनंट जनरल डी.अंबू शनिवारी लष्कर उपप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
- लष्कराच्या पूर्वेकडील कमांडचे प्रमुख म्हणून मनोज नरवणे चार हजार किलोमीटरच्या भारत-चीन सीमेवर तैनात होते. 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कमांडचे नेतृत्व केले आहे. जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडील दहशतवादी कारवायांच्या विरोधात त्यांनी लढा दिला आहे.
No comments