Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 30 September 2019

तेलुगू कवी ​​के. शिव रेड्डी यांना सरस्वती सन्मान मिळाला : के. के. बिर्ला फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘28 व्या सरस्वती सन्मान’ या सोहळ्यात तेलुगू कवी ​​के. शिव रेड्डी यांना सरस्वती सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. भारता…

तेलुगू कवी ​​के. शिव रेड्डी यांना सरस्वती सन्मान मिळाला :
  • के. के. बिर्ला फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘28 व्या सरस्वती सन्मान’ या सोहळ्यात तेलुगू कवी ​​के. शिव रेड्डी यांना सरस्वती सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला.
  • कवी ​​के. शिव रेड्डी यांना 2018 या वर्षासाठी त्यांच्या पक्काकी ओटिगीलीटे” या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे.
  • पुरस्काराविषयी : सरस्वती सन्मान या पुरस्काराची के. के. बिर्ला फाउंडेशन या संस्थेतर्फे 1991 साली स्थापना केली गेली. भारतीय संविधानाच्या अनुसूची VIII मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहीलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय साहित्यकृतीच्या सन्मानार्थ भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. प्रशस्तिपत्र, 15 लक्ष रुपये रोख आणि एक सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कलम 370 रद्द करण्यासंबंधी याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक घटनापीठ तयार केले :
  • जम्मू व काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे संविधानातले 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यावर सखोल आणि घटनात्मकरीत्या कारवाई करण्याच्या उद्देशाने, 28 सप्टेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्य असलेल्या एका घटनापीठाची स्थापना केली. या घटनापीठाची रीतसर सुनावणी ही 1 ऑक्‍टोबर 2019 पासून होणार आहे.
  • घटनापीठ न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यात न्या. एस. के. कौलन्या. आर. सुभाष रेड्डीन्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचादेखील समावेश आहे. आता या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. हे घटनापीठ केंद्र सरकारच्या 370 वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची घटनात्मक वैधता आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी दिलेला आदेश याची पडताळणी करणार आहे.

नासाने छोटा उपग्रह प्रक्षेपित केला :
  • नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) ने आभास सिक्का द्वारा डिजाइन  नासाच्या कोलंबिया सायंटिफिक बलून सुविधेतून डिझाइन केलेले लघु उपग्रह प्रक्षेपित केले आहे.
  • उपग्रहाचे नाव रमनसैट 2' असे असून त्याचे परिमाण 4 सेमी x 4 सेमी x 4 सेमी आहे.
  • सूर्यापासून किरणोत्सर्गाचे मोजमाप करण्यासाठी आणि पृथ्वीपर्यंत पोहोचणार्‍या या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे.

भारत आणि थायलंड यांनी 2,400 कोटी रुपयांच्या व्यापार करारावर स्वाक्षरी केली :
  • थायलंड आणि भारत यांनी 2,400 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहेत
  • उद्दीष्ट: दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी यात रबरबांधकाम साहित्यअन्न व पेय पदार्थलॉजिस्टिक्स या क्षेत्राचे समावेश असेल.

भारतातील सर्वात मोठी ब्रँड एचडीएफसी बँक सलग सहाव्या क्रमांकावर कायम :
  • एचडीएफसी बँकेने डब्ल्यूपीपी-कांतार ब्रँडझेड टॉप 75 सर्वात मूल्यवान भारतीय ब्रँड सलग सहाव्या वेळी रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठले. बीएफएसआय ब्रॅण्ड्सने यावर्षी पहिल्या दहा क्रमांकाच्या यादीत वर्चस्व गाजवले आहे.
  • अहवालानुसारबँकिंग ब्रँड्सने ब्रँडझेड टॉप 75 चा सर्वात मोठा वाटा उचलला असून एकूण ब्रँड व्हॅल्यूच्या 23.3 अब्ज डॉलर्सच्या 23% मालकीची आहे.

रूपा गुरुनाथ टीएनसीएच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या :
  • तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी रूपा गुरुनाथ यांची बिनविरोध निवड झाली.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राज्य शाखाप्रमुख असणारी ती पहिली महिला आहे.
  • चेन्नईत टीएनसीएच्या 87 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रूपाची निवड झाली.

आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार :
  • जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८’ या समारंभात पर्यटनविषयक सर्वांगीण विकासासाठी आंध्र प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचे पारितोषिक नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.
  • यंदा विविध विभागांमध्ये ७६ पुरस्कार देण्यात आले आहेत. साहसी पर्यटन विभागात गोवा आणि मध्य प्रदेश विभागून विजेते ठरलेतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रमोशन फ्रेंडली राज्याचा पुरस्कार उत्तराखंडला मिळाला. आयटीचा नावीन्यपूर्ण वापर करण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार तेलंगणाला मिळाला. आयटीडीसीच्या हॉटेल अशोकने बैठकीसाठीचे उत्कृष्ट ठिकाण म्हणून पुरस्कार पटकावला.

No comments