अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित : अमिताभ बच्चन यांना वयाच्या 76 व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पु…
अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित :
- अमिताभ बच्चन यांना वयाच्या 76 व्या वर्षी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
- 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाविणारे बच्चन 50 वे विजेते आहेत. या पुरस्काराचे स्वरूप एक सुवर्ण कमळ आणि 10 लक्ष रुपये असे आहे.
- अमिताभ यांना हा पुरस्कार 2018 मधील त्यांच्या सिनेमातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे. 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले.
मुकेश अंबानी आठव्यांदा सर्वाधिक श्रीमंत भारतीय :
- रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी सलग आठव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आयआयएफल वेल्थ हुरून इंडिया रिचने ही श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ३ लाख ८० हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे.
- लंडनस्थीत असलेले एस. पी. हिंदुजा अँड फॅमिली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १ लाख ८६ हजार ५०० कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे.
- विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे १ लाख १७ हजार १०० कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. IIFL च्या नवीन यादीनुसार, भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. या यादीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या वाढून ती आता ९५३ झाली आहे. २०१८ मध्ये ही संख्या ८३१ इतकी होती.
- आर्सेसर मित्तलचे अध्यक्ष आणि सीईओ एल. एन. मित्तल हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १ लाख ७ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे. गौतम अदानी हे पाचव्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती ९४ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे.
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार: पद्म श्रेणीतला नवा नागरी सन्मान
- भारत सरकारने “पद्म” या नागरी सन्मानाच्या प्रतिष्ठित पंक्तीत एक नवीन पुरस्कार जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
- हा सन्मान व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी प्रदान केला जाणार.
- पात्रता - धर्म, वंश, जाती, लिंग, जन्मस्थान, वय किंवा व्यवसाय याबाबत कोणताही भेदभाव न करता भारतातला कोणताही नागरिक आणि कोणतीही संस्था या पुरस्कारास पात्र असणार.
नासाने 17 वर्षांच्या भारतीय विद्यार्थ्याचे उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले :
- रमणसॅट 2, आकाश सिक्का याने बनविलेले एक लघु उपग्रह, नासाने यशस्वीपणे लाँच केला.
- 4 सेमी x 4 सेमी x 4 सेमी आकाराचे हे उपग्रह सिक्का यांनी खगोलशास्त्र, अंतराळ शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पेस-इंडिया या संस्थेच्या इंटर्नशिप दरम्यान विकसित केले होते. स्पेस-इंडिया युवा नवोदितांना आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील प्रदान करते.
दिल्ली 2014 स्ट्रीट व्हेंडिंग अॅक्ट लागू करणार :
- राष्ट्रीय राजधानी दिल्ली स्ट्रीट व्हेंडिंग अॅक्ट 2014 ची अंमलबजावणी करणार आहे. 24 सप्टेंबर 2019 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. या कायद्याची अंमलबजावणी करणारे दिल्ली हे पहिले राज्य असेल.
- स्ट्रीट व्हेंडिंग अॅक्ट 2014 सार्वजनिक क्षेत्रातील पथ विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांचे नियमन करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्ट्रीट विक्रेते (आजीविका संरक्षण व पथकरणाचे नियमन) कायदा 2014 पथ विक्रेते आणि फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे.
कोनेरू हंपीने 2019 स्कोल्कोव्हो फिड वुमेन्स ग्रँड प्रिक्स जिंकला :
- कोनेरू हम्पीने रशियाच्या स्कोल्कोव्हो येथे महिलांच्या विजेतेपदांकरिता स्कोलकोव्हो फिड महिला ग्रां प्री 2019 जिंकला. भारतीय ग्रॅन्डमास्टर कोनेरूने 11 सामन्यात सहा अनिर्णित आणि पाच विजयांसह आठ गुण मिळवले.
No comments