कॅप्टन संग्राम पवार अमेरिकेतल्या ‘बलून फेस्टिवल’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार : भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार हे अमेरिकेत होणार्या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात भारताचे प्रत…
- भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार हे अमेरिकेत होणार्या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2019 या काळात न्यू मेक्सिकोच्या अल्बुक्वेर्क येथे होणार आहे. यावर्षी भारत प्रथमच या कार्यक्रमात भाग घेणार आहे.
- ‘अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ हा जगातला सर्वात मोठा 'हॉट एयर बलून' कार्यक्रम आहे, ज्यामध्ये 25 देशांमधून 650 वैमानिक भाग घेतात. 770 KOB रेडिओच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणून हा कार्यक्रम 1972 सालापासून आयोजित केला जातो.
- भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार 10 ऑगस्ट 2019 रोजी ओमान देशाच्या इतिहासातले 'हॉट एयर बलून' उडविणारे पहिले वैमानिक बनले. तसेच ते पुणे (महाराष्ट्र) शहरातले प्रथम बलून पायलट आणि 1947 सालापासून भारतातले 24 वे बलून पायलट म्हणून विक्रम नोंदविला आहे.
अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द :
- अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात व्यापार चर्चा सुरू होणार असून त्याआधीच एक सकारात्मक निर्णय घेऊन अमेरिकेवर प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न दिसून येत आहे.
- अमेरिकेने व्यापार युद्धात दणका दिल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चीन व अमेरिका यांच्यात गेले एक वर्षभर व्यापार युद्ध सुरू असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. बुधवारी चीनने एकूण १६ प्रवर्गातील अमेरिकी वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो १७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. हा निर्णय एक वर्षांसाठी अमलात राहील असे सांगण्यात आले.
- सागरी उत्पादने व कर्करोगविरोधी औषधांसह काही वस्तूंचा यात समावेश असून आयात शुल्क रद्द केलेल्या वस्तूंच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. चीनने अमेरिकी वस्तूंवरचा आयात शुल्क रद्द करण्याचा हा पहिलाच निर्णय असून यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर आयात कर वाढवले होते. अल्फाल्फा पेलेट, माशांचे खाद्य, वैद्यकीय लिनियर प्रवेगक, मोल्ड रिलीज एजंट या वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्यात आला आहे. यात सोयाबीन, डुकराचे मांस यांचा समावेश मात्र केलेला नाही.
डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी :
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.
- डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.
- या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदन केले आहे. सध्या कलम ३७० हटवण्यात आल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातारण आहे. या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्र चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.
- यापूर्वी भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण येथे ‘नाग’ या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्रदेखील डीआरडीओनेच विकसीत केले होते. आता तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी नाग क्षेपणास्राच्या निर्मितीचे कार्य या वर्षाअखेर सुरू होणार आहे.
एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी :
एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू ओढवतो, तसेच माणसांवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करण्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कचरावेचक महिलांसमवेत जमिनीवर बैठक मारून कचऱ्यातून प्लास्टिक बाजूला करण्याचे काम काही काळ केले. मोदी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला २०२४ पर्यंत केंद्र सरकार १२६५२ कोटी रुपये मदत देणार आहे. यात ५०० दशलक्ष जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ३६ दशलक्ष वासरांचे लसीकरण यात केले जाणार असून त्यामुळे त्यांचे ब्रुसेलोसिस रोगापासून संरक्षण होईल. यात २०२५ पर्यंत रोगनियंत्रण व २०३० पर्यंत रोग निर्मूलन असे दोन भाग आहेत.
जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन लद्दाखमध्ये झाली :
- 7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती. या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.
स्पर्धेचे विजेते
1) 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)
2) 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)
No comments