Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide qu…
Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे.
1) कोणत्या संघाने दुलीप करंडक 2019 ही क्रिकेट स्पर्धा जिंकली?
A) इंडिया रेड
B) इंडिया ग्रीन
C) इंडिया ब्लू
D) इंडिया ब्लॅक
2) दुलीप करंडक ही स्पर्धा कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे?
A) टेनिस
B) क्रिकेट
C) फुटबॉल
D) बास्केटबॉल
3) कोणत्या व्यक्तीला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
A) विजय कुमार चोपडा
B) विनीत जैन
C) रवीश कुमार
D) विनोद दुआ
4) सप्टेंबर 2019 या महिन्यात राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक झाली?
A) कल्याण सिंग
B) शिवराज पाटील
C) रघुकुल टिळक
D) कलराज मिश्रा
5) कोणत्या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?
A) जिनेव्हा
B) क्योटो
C) ग्रेटर नोएडा
D) शांघाय
6) कोणत्या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले?
A) भारत
B) थायलंड
C) दक्षिण कोरिया
D) सिंगापूर
उत्तरे
1. (A) इंडिया रेड
बंगळुरु येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया ग्रीन संघाचा पराभव करीत इंडिया रेड संघाने दुलीप करंडक 2019 जिंकला.
2. (B) क्रिकेट
‘दुलीप करंडक’ हा भारताच्या भौगोलिक विभागांचे प्रतिनिधीत्व करणार्यां संघांच्या दरम्यान भारतामध्ये खेळली जाणारी एक स्थानिक प्रथम-श्रेणी (domestic first-class) क्रिकेट स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (BCCI) आयोजित केली जाणारी ही स्पर्धा नवानगरच्या कुमार श्री दुलीप सिंगजी यांच्या नावाने आहे. या स्पर्धेत इंडिया रेड, इंडिया ब्लू आणि इंडिया ग्रीन हे तीन संघ खेळतात.
3. (A) विजय कुमार चोपडा
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या प्रमुख वृत्त संस्थेच्या संचालक मंडळाने 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विजय कुमार चोपडा यांना PTIचे अध्यक्ष तर विनीत जैन यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले.
4. (D) कलराज मिश्रा
माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी राजस्थान राज्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मिश्रा यांना उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आले.
5. (C) ग्रेटर नोएडा
2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019 या काळात संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद (UNCCD) याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन ग्रेटर नोएडा (दिल्ली, भारत) येथे करण्यात आले. सुमारे 196 देशांमधून प्रतिनिधींनी यात भाग घेतला.
6. (B) थायलंड
दिनांक 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2019 या काळात थायलंड देशांची राजधानी बँकॉकमध्ये सातवी RCEP मंत्रिस्तरीय बैठक, सोळावी ASEAN-भारत आर्थिक मंत्री बैठक आणि सातवी पूर्व आशिया आर्थिक मंत्री शिखर परिषद 2019 हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
No comments