सयोंग अभिक्रिया: ज्या रासायनिक अभिक्रीयामध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकापासून फक्त एकाच उत्पादित मिळतो. अशा अभिक्रीयांना सयोंग अभिक्रिया असे म्हणतात.
अपघटन क्रिया: ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे प…
अपघटन क्रिया: ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात. त्या अभिक्रीयेला अपघटन अभिक्रिया म्हणतात.
विस्थापन अभिक्रिया: एखाद्या पदार्थातील अनु किंवा अणुगट दुसऱ्या पदार्थातील अणु किंवा अणुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतील तर अशा अभिक्रीयेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.
दुहेरी अभिक्रिया: ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगाची घटकांची आयन किंवा मूलक आपआपसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात. अशा अभिक्रियांना दुहेरी अभिघटन असे म्हणतात.
मंद अभिक्रिया: ज्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याला मंद अभिक्रिया असे म्हणतात. उदा भाजीपाला कुजणे, लोखंड गंजणे, दुधापासून दही तयार करणे.
शीघ्र अभिक्रिया: ज्या रासायनिक अभिक्रीयांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो. त्याला शीघ्र अभिक्रिया असे म्हणतात. उदा. फ्रुट साल्टचे पाण्यातील अपघटन.
No comments