चीनमध्ये RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक संपन्न : 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट 2019 रोजी चीनच्या बिजींग या शहरात RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक पार पडली.या बैठकीत भारतीय वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवन यांच्या नेतृत्वात भा…
चीनमध्ये RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक संपन्न :
- 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट 2019 रोजी चीनच्या बिजींग या शहरात RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक पार पडली.
- या बैठकीत भारतीय वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवन यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. बैठकीत वाधवन यांनी आजपर्यंतच्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) वाटाघाटींना आकार देण्यासाठी भारताच्या योगदानावर प्रकाश टाकला.
RCEP बद्दल
- प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्यादरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे.
- कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत नोव्हेंबर 2012 साली RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली.
- RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.
चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे :
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. या प्रवासादरम्यान चांद्रयान-2 ने पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्रे काढली असून, इस्रोने ट्विटरवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत.
- अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते याचे सुंदर चित्रण चांद्रयान-2 नेया छायाचित्रांच्या माध्यमातून केले आहे. तसेच देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 22 जुलै रोजी दुपारी चंद्राच्या दिशेने झेपावले होते.
- तर आता हे यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्राच्या जवळ पोहोचणार असून, या यानामधील विक्रम हा लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे.
मोहम्मद फहाद: AITA रँकिंग स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचा विजेता
- 3 ऑगस्टला चेन्नईत झालेल्या ‘ईनोह-आयसोल्यूशन पुरुष AITA रँकिंग स्पर्धा 2019’ या टेनिस स्पर्धेच्या एकेरी अंतिममध्ये मोहम्मद फहाद ह्याने मेघ भार्गव के. पटेल ह्याला पराभूत केले.
- 2 ऑगस्ट रोजी केविन मासिलामनी आणि मोहम्मद फहाद या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद देखील जिंकले.
AITA बद्दल
- अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) ही भारतातली टेनिसची प्रशासकीय संस्था आहे. त्याची स्थापना 1920 साली केली गेली आणि ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ आणि आशियाई टेनिस महंसघाशी संलग्न आहे.
- ही संस्था भारतात सर्व टेनिस स्पर्धा आयोजित करते, ज्यात इंडिया डेव्हिस चषक संघ, इंडिया फेड चषक संघ आणि युवा संघांचा समावेश असतो.
विनेशला फोगटला सलग तिसरे सुवर्ण :
- भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने वॉरसॉ येथे झालेली पोलंड खुली कुस्ती स्पर्धा जिंकून महिलांच्या 53 किलो गटामधील सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. 24 वर्षीय विनेशने अंतिम सामन्यात पोलंडच्या रुक्सानाचा 3-2 असा पराभव केला.
- तसेच उपांत्यपूर्व सामन्यात विनेशने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅट्सनचा (स्वीडन) पराभव केला. गेल्या महिन्यात विनेशने स्पेनमधील ग्रां. प्रि. कुस्ती स्पर्धा आणि टर्की येथील यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
भारताच्या ‘क्यूआरएसएएम’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
- भारताने सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली.
- तर संकुल- 3 मधून मोबाइल ट्रकवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केली आहे. तसेच जलद प्रतिसाद देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे हे सुरक्षा क्षेपणास्त्र चालत्या ट्रकमध्ये एका मोठय़ा कुपीत ठेवण्यात आले होते. त्यात घन इंधनाचा वापर केलेला असून त्याचा पल्ला 25-30 किलोमीटर आहे.
- या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 4 जून 2017 रोजी झाली होती. 26 फेब्रुवारी 2019 रोजी त्याच्या दोन चाचण्या एकाच दिवशी घेण्यात आल्या व त्या यशस्वी झाल्या. रविवारी दोन क्षेपणास्त्रांची वेगवेगळ्या उंचीवर चाचणी घेण्यात आली. त्यात त्याची वायुगती, इंधन क्षमता, रचनात्मक स्थिती हे घटक योग्य काम करीत असल्याचे दिसून आले आहे.
No comments