Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

Top Current Affairs (चालू घडामोडी) Quiz | 4 August 2019

Welcome to the Current Affairs Quiz Question & Answers Section SpardhaPariksha.co.in
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other comp…

Welcome to the Current Affairs Quiz Question & Answers Section SpardhaPariksha.co.in

Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.

Note :- सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिले आहे 

1) जागतिक बँकेच्या ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
A) ब्रिटन
B) संयुक्त राज्ये अमेरीका
C) चीन
D) जापान

2) जागतिक बँकेच्या 2018 सालासाठीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जागतिक GDP क्रमवारीत भारताला सातव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. 2018 साली भारताने _______ इतक्या मूल्याचा GDP नोंदविला.
A) 1.73 लक्ष कोटी डॉलर
B) 2.73 लक्ष कोटी डॉलर
c) 3.73 लक्ष कोटी डॉलर
D) 4.73 लक्ष कोटी डॉलर

3) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या माइंडट्री या कंपनीच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) याचे नाव ओळखा.
A) देबाशिस चटर्जी
B) एस. एन. सुब्रह्मण्यन
C) वाय. एस. कुमार
D) एस. शेखर

4) मिस इंग्लंड 2019 या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट कोणी जिंकला?
A) जॉर्जिया हॉर्सली
B) एलेनोर ग्लेन
C) हम्मासा कोहिस्तानी
D) भाषा मुखर्जी

5) पृथ्वी आणि चंद्र यांच्यादरम्यानचे अंदाजे अंतर किती आहे?
A) 156,400 किमी ते 206,700 किमी
B) 256,400 किमी ते 306,700 किमी
C) 356,400 किमी ते 406,700 किमी
D) 456,400 किमी ते 506,700 किमी

6) 2 ऑगस्ट 2019 रोजी पाकिस्तानने फाळणीच्या 72 वर्षानंतर शीख भाविकांसाठी गुरुद्वारा चौवा साहिब” खुले केले. गुरूद्वारा चौवा साहिब कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) गुजरातपाकिस्तान
B) झांगपाकिस्तान
C) झेलमपाकिस्तान
D) कसूरपाकिस्तान

7) क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) याच्या त्या माजी अध्यक्षाचे नाव ओळखाज्याचे नाव चर्चगेट येथील क्लबच्या क्रिडा संकुलाचे दिनशॉ वाचा मार्गावरील प्रवेशद्वाराला दिले जाणार आहे.
A) नारी कॉंट्रॅक्टर
B) राजसिंग डूंगरपूर
C) विजय मर्चंट
D) सचिन तेंडुलकर

उत्तरे
1.  (B) संयुक्त राज्ये अमेरीका
जागतिक बँकेनी ऑगस्ट 2019 रोजी ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ प्रसिद्ध केले. त्यानुसारजागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product -GDP) क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर 20.5 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह अमेरीका (US) जागतिक GDP क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे.

2. (B) 2.73 लक्ष कोटी डॉलर
जागतिक बँकेनी ऑगस्ट 2019 रोजी ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ प्रसिद्ध केले. त्यानुसारजागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product -GDP) क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. 2018 साली भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य 2.73 लक्ष कोटी डॉलर इतके होते. इंग्लंड आणि फ्रान्सने भारताला मागे टाकत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर झेप घेतली.

3. (A) देबाशिस चटर्जी
ऑगस्ट 2019 रोजी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या माइंडट्री या कंपनीने त्याचे नवे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून देबाशिस चटर्जी यांची नेमणूक केली.

4.  (D) भाषा मुखर्जी
भारतीय-ब्रिटिश डॉक्टर भाषा मुखर्जी यांनी मिस इंग्लंड 2019 या सौंदर्य स्पर्धेचा मुकुट जिंकला. डर्बी येथील 23 वर्षीय भाषा मुखर्जी यांच्याकडे दोन वैद्यकीय पदवी असून त्यांचा IQ 146 एवढा आहे.

5. (C) 356,400 किमी ते 406,700 किमी
पृथ्वीचा चंद्र एक खगोलशास्त्रीय घटक आहेजो ग्रहाची परिक्रमा करतो आणि पृथ्वीचा एकमेव कायम नैसर्गिक उपग्रह म्हणून काम करतो. आपल्या सूर्यमालेतला हा पाचवा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातले अंतर जवळ असताना सुमारे 356,400 किमी (221,500 मैल) तर दूर असताना 406,700 किमी (252,700 मैल) एवढे असते.

6. (C) झेलमपाकिस्तान
ऑगस्ट 2019 रोजी पाकिस्तानने फाळणीच्या 72 वर्षानंतर पंजाब प्रांतातल्या "गुरुद्वारा चौवा साहिब" या ऐतिहासिक शीख श्रद्धास्थानाचे दरवाजे भारतीयांसह शीख भाविकांसाठी उघडले आहेत. हा गुरुद्वारा पंजाब प्रांताच्या झेलम जिल्ह्यात आहे. हा गुरुद्वारा 1834 साली महाराजा रणजित सिंग यांनी बांधला.

7. (C) विजय मर्चंट
मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) ने भारताचे माजी कसोटीवीर आणि फलंदाज दिवंगत विजय मर्चंट यांच्या क्रिकेटमधील योगदानाची आठवण नवोदित क्रिकेटपटूंना व्हावी यासाठी प्रवेशद्वाराचे विजय मर्चंट असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट येथील क्लबच्या क्रिडा संकुलाचे दिनशॉ वाचा मार्गावरील प्रवेशद्वाराला माजी कसोटीवीर विजय मर्चंट यांचे नाव देण्यात येणार आहे. हा नामकरण समारंभ ऑगस्टला आयोजित केला आहे. CCIच्या मालकीचे दक्षिण मुंबईत बेबॉर्न स्टेडियम आहे. मुंबई संघाकडून खेळताना दिवंगत विजय मर्चंट यांनी दहा कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना 849 धावा जमविल्या आहेत. त्यांचे 1987 साली निधन झाले होते. ते 1971 ते 1985 या कालावधीत क्लबचे अध्यक्ष होते.

No comments