Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 4 August 2019

2018 साली भारत सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली: जागतिक बँक जागतिक बँकेनी 2 ऑगस्ट 2019 रोजी “ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ प्रसिद्ध केले. त्यानुसार, जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product -GDP) क्रमवारीत भारतीय अर…

2018 साली भारत सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली: जागतिक बँक
  • जागतिक बँकेनी 2 ऑगस्ट 2019 रोजी ग्लोबल GDP रॅंकिंग फॉर 2018’ प्रसिद्ध केले. त्यानुसारजागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product -GDP) क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. 2018 साली भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य 2.73 लक्ष कोटी डॉलर इतके होते.
  • इंग्लंड आणि फ्रान्सने भारताला मागे टाकत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर झेप घेतली. 2017 साली भारतीय अर्थव्यवस्थेनी या क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली होती. त्यामुळे फ्रान्सची सातव्या स्थानावर घसरण झाली होती. मात्र, 2018 साली फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा हे स्थान परत मिळवले.
  • 20.5 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह अमेरीका (US) जागतिक GDP क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे. अमेरीकेपाठोपाठ द्वितीय स्थानावर चीन (13.6 लक्ष कोटी डॉलर) तर तृतीय क्रमांकावर जपान (4.9 लक्ष कोटी डॉलर) आहे. चौथ्या क्रमांकावर 3.9 लक्ष कोटी डॉलरसह जर्मनी आहे.
  • आर्थिक वर्ष 2017 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP 2.6 लक्ष कोटी डॉलर इतका होता. जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारताने मिळवला होता. मात्रयानंतर रुपयाच्या मूल्यातल्या चढ-उतारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

चंद्रयान-2’ची परिभ्रमण कक्षा चौथ्यांदा वाढविण्यात यश आले: ISRO
  • भारताच्या चंद्रयान-2’ याचा प्रवास आता चौथ्या टप्प्यात आला आहे. 2 ऑगस्ट 2019 रोजी त्याच्या कक्षेत यशस्वीरित्या वाढ करीत त्याला प्रवासाच्या चौथ्या टप्प्यात त्याला ठेवले आहे.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) मतेचंद्रयान-2ची कक्षा 89.472 किलोमीटरच्या 277 पटीने वाढविण्यात आली आहे.
  • योजनेनुसार आता पाचवा टप्पा म्हणजेच शेवटचा टप्पा 6 ऑगस्ट 2019 रोजी नियोजित केला गेला आहे. पुढे 14 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पाठवले जाणार आणि 20 ऑगस्टपर्यंत यान चंद्रावर पोहोचणार. 7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम’ लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
  • श्रीहरिकोटा येथून 22 जुलै 2019 रोजी अवकाशात झेपावलेले चंद्रयान-यानाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. चंद्रयान-ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे.

नेदरलँड्सने सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि निकाबवर बंदी घातली :
  • नेदरलँड्सने पुराणमतवादी मुस्लिम महिलांनी ऑगस्ट रोजी घातलेला बुरखा आणि निकाब यांच्यासह चेहरा पांघरूण घालण्यास बंदी घातली आहे. नवीन डच कायद्याने मुस्लिम महिलांना सार्वजनिक वाहतूकसरकारसह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणीइमारती आणि आरोग्य आणि शिक्षण संस्थामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर बुरखा आणि निकाब घालण्यास बंदी घातली आहे.
  • तथापिहे सार्वजनिक रस्त्यावर लागू होत नाही. बुरखानिकाब किंवा बुरखा याशिवाय मोटार हेल्मेट आणि स्की मास्कवरही कायद्याने बंदी घातली आहे. यात मुख्याध्यापिकाचा समावेश नसतो कारण ते फक्त डोके झाकतात आणि चेहरा नव्हे. कायदा मोडल्याबद्दल नेदरलँड्सने दीडशे युरोचा दंड ठोठावला आहे. नेदरलँड्स सरकारने चेहरा झाकण्यावर बंदी घालून हा कायदा लागू केला आहेपरंतु कायद्याची अंमलबजावणी किती कठोरपणे केली जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे.

भारतीय पोस्ट सुरू करणार ई ट्रेडिंग सेवा’ !
  • देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यानपोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.
  • भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसीफ्रिजटिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.
  • सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश बनणार देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्य :
  • दुसऱ्या पायाभरणी समारंभात समाविष्ट असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेश हे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य बनेलअसे प्रतिपादन फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांनी केले आहे.
  • गेल्या वर्षी झालेल्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करारांवर स्वाक्षºया करण्यात आल्या होत्या. त्यातील 65 हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. हा राज्यातील अशा प्रकारचा दुसरा पायाभरणी समारंभ होता. पहिला पायाभरणी समारंभ गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता.
  • पहिल्या टप्प्यात 60 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट होते. हा पायाभरणी समारंभ उत्तर प्रदेशला देशातील आघाडीचे औद्योगिक राज्यतसेच नव्या संकल्पनांचे भांडार बनविण्यात साह्यभूत ठरेल. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दूरदृष्टी आणि सक्षम पुढाकार यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. व्यवसाय सुलभतेत आणखी सुधारणा होणेही अपेक्षित आहे.

मायक्रोडॉट पॅचेसच्या सहाय्याने वाहन चोरीचा सामना करण्याची केंद्राची योजना :
  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) जीएसआर 521(E) एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे आणि ती मोटार वाहने आणि त्यांचे भागघटकसंमेलनेउप-संमेलनांना मायक्रोडॉट पॅचेस चिकटवून घेण्यास परवानगी देते.
  • एमआरटीएचने मसुद्याच्या अधिसूचनेवर 30 दिवसात टिप्पण्या / हरकती मागितल्या आहेत. तसेचमायक्रोडॉट्सला एआयएस (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड) 155 आवश्यकतांचे पालन करावे लागेल. ते मायक्रोडॉट तंत्रज्ञानावर आधारित आहेत ज्यात फवारणीसाठी शरीर आणि वाहनाचे भाग किंवा इतर कोणत्याही मशीनला सूक्ष्म ठिपके आहेतज्यामुळे एक वेगळी ओळख मिळते.
  • मायक्रोडॉट्स आणि चिकट कायमस्वरूपी फिक्स्चर/फिकेशन्स बनतील जे स्वतः वाहनांच्या मालमत्तेस हानी पोहचविल्याशिवाय काढले जाऊ शकत नाहीत.

No comments