Welcome to the Current Affairs Quiz Question & Answers Section of SpardhaPariksha.co.in
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other c…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
1) कांती भट्ट यांचे ऑगस्ट महिन्यात निधन झाले. ते एक प्रसिद्ध _______ होते.
A) लेखक
B) गायक
C) पत्रकार
D) नेमबाज
2) ATP वॉशिंग्टन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी रशियाच्या डॅनिल मेदवेदेव ह्याला कोणी पराभूत केले?
A) रॉजर फेडरर
B) राफेल नदाल
C) निक किर्गीओस
D) नोव्हाक जोकोविच
3) मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'एक्सेलेन्स इन सिनेमा' सन्मान कोणाला देण्यात येईल?
A) अक्षय कुमार
B) शाहरुख खान
C) इम्रान खान
D) राजकुमार राव
4) कोणत्या कंपनीला क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अॅवॉर्ड 2019’ देण्यात आला?
A) भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL)
B) GAIL मर्यादित
C) टाटा स्टील
D) NTPC मर्यादित
5) ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचे नाव काय आहे?
A) पीटर कर्स्टन
B) डेल स्टेन
C) अॅड्रियन किपर
D) ब्रायन मॅकमिलन
6) IIT दिल्ली येथे ‘टेकएक्स 2019’ या तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनीचे उद्घाटन कोणी केले?
A) नरेंद्र मोदी
B) राम नाथ कोविंद
C) राजनाथ सिंग
D) रमेश पोखरियाल 'निशंक'
उत्तरे
1. (C) पत्रकार
ज्येष्ठ गुजराती पत्रकार आणि स्तंभलेखक कांती भट्ट यांचे 5 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
2. (C) निक किर्गीओस
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओस ह्याने ‘ATP वॉशिंग्टन ओपन 2019’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले. त्याने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेव ह्याला पराभूत केले
3. (B) शाहरुख खान
बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान ह्याला 8 ऑगस्ट रोजी मेलबर्नमध्ये होणार्या भारतीय चित्रपट महोत्सवात 'एक्सिलन्स इन सिनेमा' हा सन्मान दिला जाणार आहे.
4. (A) भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL)
यंदाच्या ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अॅवॉर्ड 2019’ या सोहळ्यात क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याला हा पुरस्कार मिळाला आहे. 3 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
5. (B) डेल स्टेन
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन ह्याने 5 ऑगस्टला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
6. (D) रमेश पोखरियाल 'निशंक'
IIT दिल्ली येथे ‘टेकएक्स 2019’ (टेक्नॉलॉजी एक्झिबिशन) आयोजित करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. IMPRINT आणि उच्चतर आविष्कार योजना (UAY) या दोन प्रमुख योजनांच्या अंतर्गत विकसित केलेली उत्पादने आणि नमुन्यांचे प्रदर्शन करण्यासाठी ही प्रदर्शनी भरवली गेली.
No comments