Page Nav

HIDE

Post/Page

Weather Location

Breaking News:

latest

(चालू घडामोडी) Current Affairs | 7 August 2019

SAIL: ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ याचा विजेता यंदाच्या ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019’ या सोहळ्यात क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये भारतीय पोलाद प्रा…

SAIL: ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ याचा विजेता
  • यंदाच्या ‘SCOPE कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019’ या सोहळ्यात क्राइसिस कम्युनिकेशन्स आणि इंटर्नल कम्युनिकेशन्स या दोन श्रेणींमध्ये भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याला हा पुरस्कार मिळाला आहे.
  • 3 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
  • प्रसारमाध्यमकर्मचारी आणि लोकांचा विश्वास संपादन करणारी जबाबदारप्रामाणिक आणि पारदर्शक कॉर्पोरेट असल्याबद्दल क्राइसिस कम्युनिकेशन्स श्रेणीत SAIL ला हा पुरस्कार मिळाला. तर इंटर्नल कम्युनिकेशन्सच्या श्रेणीमध्ये हा पुरस्कार कॉर्पोरेटला विविध प्रसारमाध्यमांचा अभिनव वापर करून कर्मचार्‍यांशी संघटनात्मक बंध बळकट करण्यासाठीत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तसेच कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी दिला गेला.

कसोटी क्रमवारीत स्मिथ तिसऱ्या स्थानी :
  • इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.
  • तर त्याचे 900 गुण झाले आहेत. विराट (922 गुण)केन विल्यमसन (913 गुण) यांच्यानंतर तो तिसर्या स्थानी आहे. या कसोटीपुर्वी त्याचे 857 गुण होते.
  • तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे तर पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणार्या स्मिथने 144 व 142 धावांची खेळी केली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन :
  • भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यामाजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या.
  • तसेच भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून 2019ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

काश्मीर धोरण संसदेत संमत :
  • जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणेया मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर लोकसभेने शिक्कामोर्तब केले.
  • अनुच्छेद 370 संपुष्टात आणण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारा प्रस्ताव 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आला. यामुळे गेली 70 वष्रे अमलात असलेला हा अनुच्छेद कायमस्वरूपी रद्द होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेश करणारे विधेयकही
  • तसेच जम्मू आणि काश्मीरमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णाना दहा टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. मात्र अनुच्छेद 370 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये उर्वरित देशातील सर्व कायदे लागू होऊ शकतील.
  • त्यामुळे या विधेयकाची आता गरज उरली नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही मंजुरी देण्यात आली.

No comments