Welcome to the Current Affairs Quiz Question & Answers
Section SpardhaPariksha.co.in
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other comp…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
1) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (T20I) ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने मोडला?
A) एम. एस. धोनी
B) शिखर धवन
C) रोहित शर्मा
D) विराट कोहली
2) QRSAM याचे पूर्ण रूप काय आहे?
A) क्विकर रिस्पोन्स सर्फेस-टू-एयर मिसाईल
B) क्विकर रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल
C) क्विक रिस्पोन्स सर्फेस-टू-एयर मिसाईल
D) क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल
3) कोणत्या स्मारकाला ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले?
A) दुबई फ्रेम
B) तमिना कॅनयन क्रॉसिंग
C) स्टॅच्यू ऑफ युनिटी
D) क्वीन्सफेरी क्रॉसिंग
4) BWF सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी कोणती आहे?
A) मनू अत्री आणि बी. सुमेथ रेड्डी
B) सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी
C) सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि बी. सुमेथ रेड्डी
D) मनू अत्री आणि चिराग शेट्टी
5) वारसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
A) विनेश फोगट
B) सुशील कुमार
C) साक्षी मलिक
D) योगेश्वर दत्त
उत्तरे
1. (C) रोहित शर्मा
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (T20I) ख्रिस गेलचा 105 षटकांचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. त्याने 106* षटकार लागवले.
2. (D) क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल
4 ऑगस्टला ओडिशाच्या तळावरून भारताने आपल्या क्विक रिएक्शन सर्फेस-टू-एयर मिसाईल’ (QRSAM) या क्षेपणास्त्राची एकापाठोपाठ दोनदा यशस्वी चाचणी घेतली. QRSAM याची मारा क्षमता 25-30 कि.मी. एवढी आहे. ते सॉलिड-फ्यूल प्रोपेलेंट आहे.
3. (C) स्टॅच्यू ऑफ युनिटी
गुजरातमध्ये केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) या 182 मीटर उंचीच्या पुतळ्याच्या प्रकल्पाला ब्रिटनच्या ‘इंस्टीट्यूट ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स’ (IStructE) या संस्थेच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ यासाठी हा प्रकल्प शर्यतीत आहेत. 49 स्थापत्यांशी या प्रकल्पास स्पर्धा करावी लागणार आहे. या पुरस्काराची घोषणा 15 नोव्हेंबर 2019 रोजी लंडनमध्ये केली जाणार आहे. इतर स्थापत्यांमध्ये चीनमधील हाँग्क्रीझोऊचे क्रिडामैदान, लंडनमधील पंचतारांकित हॉटेलची इमारत इत्यादी वास्तूंचा समावेश आहे.
4. (B) सात्विकसाईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी
सात्विकसाईराज रंकारेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने 2019 थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे सुवर्णपदक पटकावले. या विजयासोबतच, BWF सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी आहे. अंतिम लढतीत भारतीय जोडीने चीनच्या ली जुन हुई-ल्यु यू चेन जोडीचा पराभव केला.
5. (A) विनेश फोगट
पोलंडमधील वारसॉ येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगटने महिलांच्या 53 किलो वजन गटात सलग तिसरे सुवर्ण पटकावले. 24 वर्षीय विनेशने स्थानिक महिला मल्ल रुकसानाचा पराभव केला. विनेशने त्याआधी स्वीडनच्या सोफिया मॅटसनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता.
No comments