‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याला ब्रिटनच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले : गुजरातमध्ये केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) या पुतळ्याच्या प्रकल्पाला ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी न…
- गुजरातमध्ये केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा) या पुतळ्याच्या प्रकल्पाला ब्रिटनच्या ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
- ‘द स्ट्रक्चरल अवॉर्ड्स-2019’ यासाठी हा प्रकल्प शर्यतीत आहेत. 49 स्थापत्यांशी या प्रकल्पास स्पर्धा करावी लागणार आहे. या पुरस्काराची घोषणा 15 नोव्हेंबर 2019 रोजी लंडनमध्ये केली जाणार आहे. इतर स्थापत्यांमध्ये चीनमधील हाँग्क्रीझोऊचे क्रिडामैदान, लंडनमधील पंचतारांकित हॉटेलची इमारत इत्यादी वास्तूंचा समावेश आहे.
- गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.
1000 रुपयांची नोट चलनात आणण्यासंबंधीचा 1999 सालाचा कायदा रद्द :
- भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) 1000 रुपये मूल्य असलेली नोट चलनात आणण्याची परवानगी देणारा 1999 सालाचा कायदा रद्द करण्यात आला आहे.
- ‘उच्च परिमाण बँक नोटा (चलन अवैधता) दुरूस्ती कायदा-1998’ (High Denomination Bank Notes (Demonetisation) Amendment Act) हा गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या 58 कायद्यांपैकी एक आहे. 2 ऑगस्ट 2019 रोजी 58 कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेनी मंजूर केले. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी चलनी नोटांची कमतरता दूर करण्यासाठी डिसेंबर 1998 मध्ये हे विधेयक आणले होते.
- 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने महात्मा गांधी मालिकेच्या सर्व 500 आणि 1000 रुपये मूल्य असलेल्या नोटा चलनातून बाद केल्या. तसेच 500 आणि 2000 रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा देण्याची घोषणा केली.
वेगवान गोलंदाज डेल स्टेनने घेतली निवृत्ती :
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द वाढवण्यासाठी स्टेनने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
- मी क्रिकेटमधील माझ्या आवडत्या फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे, पण यानंतर वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचं निवृत्तीवेळी स्टेनने सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 2004 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
- 36 वर्षीय डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेकडून 93 कसोटी सामन्यात 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या आहेत. डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये 26 वेळा एकाच डावात पाचहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
अनुच्छेद ३७० म्हणजे काय :
- अनुच्छेद ३७० हे राज्यघटनेत १७ ऑक्टोबर १९४९ रोजी समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. केंद्राचा कायदा राज्याला लागू करण्यासाठी राज्य सरकारशी सल्लामसलत आवश्यक करण्यात आली, तर राज्यसूचीतील विषयांवर कायदे लागू करण्यासाठी सल्लामसलत सक्तीची करण्यात आली.
- विलीनीकरण पत्रिको (सामीलनामा) भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ ब्रिटिशांनी केलेल्या फाळणीनंतर अस्तित्वात आला. स्वातंत्र्यानंतर स्वायत्तता राखून सहाशे संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले. त्या वेळी भारतात सामील होणे किंवा पाकिस्तानात जाणे असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यासाठी कुठला आराखडा निश्चित केला नव्हता. त्यामुळे जी संस्थाने भारतात विलीन होण्यास तयार होती त्यांना त्यांच्या अटी मांडण्याची मुभा होती. जर अटींचे उल्लंघन झाले तर विलीन राज्ये पूर्वस्थिती धारण करतील, असे सांगण्यात आले होते.
- काश्मीरच्या विलीनीकरण अटी काय होत्या:- जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाबाबत जी माहिती अनुशेषात जोडली आहे त्यावरून भारतीय संसदेला फक्त जम्मू-काश्मीर संदर्भात संरक्षण, परराष्ट्र कामकाज, दूरसंचार याबाबत कायदे करण्याचा अधिकार आहे. विलीनीकरण करार कलम ५ अनुसार जम्मू काश्मीरचे राजे राजा हरी सिंह यांनी म्हटले होते, की भारतीय स्वातंत्र्य कायदा किंवा इतर मार्गाने विलीनीकरणाच्या अटीत बदल करता येणार नाही. कलम ७ नुसार भारतीय राज्यघटना भविष्यकाळात स्वीकारण्याचे बंधन आमच्यावर नाही. तो आमचा अधिकार राहील.
पोलंड कुस्ती स्पर्धा : विनेश फोगटचे तिसरे सुवर्ण पदक
- कुस्तीपटू विनेश फोगटनं पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात विजय मिळवत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकत भारताचे नाव उंचावले आहे.
- विनेशचा सामना पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात पोलंडच्या रुक्सानाशी झाला.या सामन्यात विनेश फोगटनं रुक्सानाला ३-२ ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
- मागील महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या ग्रां प्री आणि तुर्कीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली होती. आणि आताही पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांमुळे तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.
No comments