Welcome to the Current Affairs Quiz Question & Answers Section SpardhaPariksha.co.in
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other comp…
Current Affairs Quiz on a daily basis for students to improve general awareness. Aspirants preparing for banking, SSC, Railway and other competitive examination can take Current Affairs Quiz on a regular basis here. We provide questions and answers on current affairs based on national & international events for banking, SSC, Railway and other government exams. Attempt this Current Affairs Quiz and check your score instantly to know about your preparation level.
1) 3 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) फसवणूकीचा अहवाल देण्यासंबंधित त्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातल्या चार बँकांना दंड ठोठावला. पुढीलपैकी कोणती बँक त्या चारमधली नाही?
A) इंडियन बँक
B) भारतीय स्टेट बँक
C) बँक ऑफ बडोदा
D) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
2) अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A) वर्ष 1920
B) वर्ष 1940
C) वर्ष 1960
D) वर्ष 1999
3) ‘ईनोह-आयसोल्यूशन पुरुष AITA रँकिंग स्पर्धा 2019’ या टेनिस स्पर्धेच्या एकेरी अंतिममधील विजेता कोण आहे?
A) केविन मासिलामनी
B) मेघ भार्गव के. पटेल
C) मोहम्मद फहाद
D) नोहा मे
4) 2013 साली मानद अकादमी पुरस्कार मिळालेले ________ या देशाचे माहितीपट निर्माता डॉन अॅलन पॅनेबॅकर यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
A) फ्रान्स
B) अमेरीका
C) ब्रिटन
D) ऑस्ट्रेलिया
5) जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट असलेला जगातला सर्वात मोठा आर्थिक गट कोणता आहे?
A) प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP)
B) आशिया-प्रशांत आर्थिक सहकार (APEC)
C) आर्थिक सहकार संस्था (ECO)
D) आर्थिक सहकार आणि विकास संस्था (OECD)
6) 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट 2019 रोजी कुठे RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक पार पडली?
A) टोकियो, जापान
B) नवी दिल्ली, भारत
C) बिजींग, चीन
D) सिंगापूर
उत्तरे
1. (A) इंडियन बँक
3 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) फसवणूकीचा अहवाल देण्यासंबंधित RBIच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातल्या चार बँकांवर दंड आकारला, त्यामध्ये भारतीय स्टेट बँक (SBI) (50 लक्ष रुपये), PNB (50 लक्ष रुपये), बँक ऑफ बडोदा (50 लक्ष रुपये), ऑरींएंटल बँक ऑफ कॉमर्स (1.5 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
2. (A) वर्ष 1920
अखिल भारतीय टेनिस संघ (AITA) ही भारतातली टेनिसची प्रशासकीय संस्था आहे. त्याची स्थापना 1920 साली केली गेली आणि ही आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ आणि आशियाई टेनिस महंसघाशी संलग्न आहे. ही संस्था भारतात सर्व टेनिस स्पर्धा आयोजित करते, ज्यात इंडिया डेव्हिस चषक संघ, इंडिया फेड चषक संघ आणि युवा संघांचा समावेश असतो.
3. (C) मोहम्मद फहाद
3 ऑगस्टला चेन्नईत झालेल्या ‘ईनोह-आयसोल्यूशन पुरुष AITA रँकिंग स्पर्धा 2019’ या टेनिस स्पर्धेच्या एकेरी अंतिममध्ये मोहम्मद फहाद ह्याने मेघ भार्गव के. पटेल ह्याला पराभूत केले. 2 ऑगस्ट रोजी केविन मासिलामनी आणि मोहम्मद फहाद या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद देखील जिंकले.
4. (B) अमेरीका
2013 साली मानद अकादमी पुरस्कार (ऑस्कर) मिळालेले अमेरीकेचे माहितीपट निर्माता डॉन अॅलन पॅनेबॅकर यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. परफॉर्मिंग आर्ट्स आणि राजकारण हे त्यांचे प्राथमिक विषय होते. 2013 साली अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस कडून त्यांना मानद अकादमी पुरस्कार किंवा "आजीवन ऑस्कर" देऊन सन्मानित करण्यात आले होते.
5. (A) प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP)
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य आणि त्याचे सहा FTA भागीदार यांच्यादरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे. कंबोडियात झालेल्या ASEAN शिखर परिषदेत नोव्हेंबर 2012 साली RCEP वाटाघाटी औपचारिकपणे लागू झाली. RCEP हा जगातला सर्वात मोठा आर्थिक गट आहे आणि जवळपास निम्मी जागतिक अर्थव्यवस्था या गटात समाविष्ट आहे. या भागात 3.4 अब्ज लोकसंख्या असून एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP, PPP) 49.5 लक्ष कोटी डॉलर इतके आहे.
6. (C) बिजींग, चीन
2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट 2019 रोजी चीनच्या बिजींग या शहरात RCEP आंतरसत्रीय मंत्री परिषदेची 8 वी बैठक पार पडली. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (Regional Comprehensive Economic Partnership -RCEP) हा आग्नेय आशियाई देशांचा संघ (ASEAN) याचे दहा सदस्य (ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड, व्हिएतनाम) आणि त्याचे सहा FTA भागीदार (चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड) यांच्यादरम्यानचा प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) आहे.
No comments